Photo of Gul Papdi by Deepa Gad at BetterButter
1069
8
0.0(1)
0

Gul Papdi

Nov-27-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र

साहित्य सर्विंग: 4

  1. साधा गुळ पाव किलो
  2. बेकिंग सोडा (खायचा सोडा) ३/४ च
  3. पाणी १ च
  4. तूप १ च
  5. बडीशेप १/२ च
  6. ड्रायफ्रूटस आवडीनुसार

सूचना

  1. गुळ चिरुन घ्या
  2. बाकी सर्व साहित्य तयार ठेवा
  3. ताटाला तूप लावून घ्या
  4. ही सर्व तयारी झाली की गॅसवर कढई ठेवा
  5. कढईत तूप व पाणी घाला
  6. त्यात गुळ घाला व सतत ढवळत रहा
  7. बुडबुडे यायला सुरुवात झाली की वाटीत पाणी घ्या व त्यात हे गुळाचे मिश्रण थोडे घाला व हाताने बघा
  8. तो गोळा जात नरम लागत असेल तर अजून शिजवा
  9. परत एकदा वाटीत मिश्रण घालून बघा, गोळा जर कुरकुरीत असा मोडत असेल तर शिजले असे समजावे
  10. गॅस बंद करा व लगेच त्यात खायचा सोडा घालून ढवळा ते मिश्रण फुलेल मग तूप लावलेल्या थाळीत लगेच ओता
  11. वरून बडीशेप, ड्रायफ्रूटस घाला व तसंच न हलवता १ तास सेट होऊ द्या
  12. मग ताट पलटी करून हाताने ठोकल्यासारखं करा म्हणजे गुळपापडी अलगद निघेल
  13. हातानेच तोडा आतमध्ये जाळी वरीलप्रमाणे दिसेल
  14. ही झाली आपली गुळ पापडी तयार

रिव्यूज (1)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
Sharwari Vyavhare
Nov-28-2018
Sharwari Vyavhare   Nov-28-2018

So yummy.........

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर