मुख्यपृष्ठ / पाककृती / कुळथाचे उकड कडबोळी

Photo of Kulathache uakd kadaboli by Arya Paradkar at BetterButter
1025
2
0.0(0)
0

कुळथाचे उकड कडबोळी

Nov-29-2018
Arya Paradkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कुळथाचे उकड कडबोळी कृती बद्दल

माझी आजेसासू कोकणातील, त्यांच्या कडून सासूबाईंकडे व त्यांच्या कडून मला हा पदार्थ कळाला माझी आजी ही करायची पण ज्वारी, बाजरी, कणीक घालून करायची उकड कडबोळी पहा करून आवडली तर...

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 वाट्या कुळीथ पीठ
  2. 10 -12 लसूण पाकळ्या
  3. 6 -7 मिरच्या
  4. कोथिंबीर
  5. 1 चमचा जीरे
  6. 2 चमचे आगळ
  7. 3-4 चमचे तेल
  8. 1 चमचा मोहरी
  9. 1/2 चमचा हळद
  10. पाव चमचा हिंग
  11. 2 चमचे तिखट
  12. 1 चमचा धणे जिरे पावडर
  13. मीठ चवीनुसार

सूचना

  1. लसूण मिरची जीरे कोथिंबीर घालून पेस्ट करून घ्यावी
  2. कुळीथ पिठात हळद, हिंग, तिखट, धणे जिरे पावडर, मिरची लसुण पेस्ट थोडे थोडे पाणी घालून पिठ मळून घ्यावे
  3. भिजवलेल्या पिठाची कडबोळी करुन घ्यावी
  4. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी हिंग हळद घालून फोडणी करुन त्यात मिरची व लसूण पेस्ट घालून चांगले परतून घ्यावे व त्यात 5-6 वाटी पाणी घालून वरील पिठाच्या थोड्या मिश्रणात पाणी घालून त्याची पेस्ट करून उकळत्या पाण्यात घालून चांगले मिक्स करावे व त्यात आगळ, मीठ चांगले उकळून घ्यावे
  5. त्यात तयार केलेली कडबोळी घालून चांगले उकळून शिजवून घ्यावे
  6. त्यावर साजूक तूप घालून सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर