मुख्यपृष्ठ / पाककृती / टोमॅटो कांदा भाजी

Photo of Tomato kanda bhaji by Arya Paradkar at BetterButter
1144
2
0.0(0)
0

टोमॅटो कांदा भाजी

Nov-30-2018
Arya Paradkar
5 मिनिटे
तयारीची वेळ
8 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

टोमॅटो कांदा भाजी कृती बद्दल

माझी आजी जर एखाद्या नातवंडांना एखादी भाजी आवडत नसेल तर तिच्या कडे पर्याय म्हणून झटपट तयार होणारी ही भाजी, कधी पिठले असे काही करुन ती वेळ निभावून न्यायची आणि यामुळे मला ही मुलांना भाजी काय देऊ प्रश्न पडतो तेव्हा मी हि झटपट डब्याला भाजी करते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. 2 मोठे टोमॅटो
  2. 1 कांदा
  3. 2-3 चमचे शेंगदाणे कुट
  4. 1 चमचा तिखट
  5. 1/2 चमचा मालवणी मसाला
  6. 1 चमचा साखर
  7. मीठ चवीनुसार
  8. 2 चमचे तेल
  9. 1/2 चमचा मोहरी
  10. 1/2 चमचा हळद
  11. पाव चमचा हिंग

सूचना

  1. टोमॅटो व कांद्याचे बारीक चिरून घ्यावा
  2. एका कढईत तेल गरम करून त्यात मोहरी ,हिंग, हळद घालून फोडणी करुन त्यात कांदा परतून घ्यावा व नंतर टोमॅटो घालून चांगले परतून घ्यावे
  3. नंतर त्यात सर्व मसाले, मीठ व शेंगदाणे कुट घालुन चांगले परतून घ्यावे
  4. वाफ काढून शिजवून घ्यावे
  5. भाजी तयार

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर