मुख्यपृष्ठ / पाककृती / वांग्याचे भरीत आणि बाजरीचे रोडगे
माझ्या लहानपणी चंपाषष्ठीला आमच्या घरी खंडोबाची तळी भरली जायची. माझी आजी यादिवशी संध्याकाळी खंडोबाला नैवेद्यासाठी वांग्याचे भरीत आणि बाजरीचे रोडगे बनवायची. संध्याकाळी आजूबाजूच्या मुलांना बोलावून आमचे आजोबा खंडोबाची तळी भरायचे, 'येळकोट येळकोट जयमल्हार' ! असा खंडोबाच्या नावाचा गजर करत तळी भरली जायची. तळी भरल्यावर आजोबा वांग्याचे भरीत आणि बाजरीचे रोडगे यांचा नैवेद्य दाखवायचे व बोलावलेल्या सर्व मुलांना एक एक रोडगा प्रसाद म्हणून दिला जायचा. आम्हा सर्व मुलांना हा प्रसाद इतका आवडायचा की बस ! तो प्रसादाचा रोडगा आणि भरीत हातात घेऊन खाण्याची मजाच काही और असायची. आहाहा ! आता आठवलं तरी तोंडाला पाणी सुटते. माझी आजी दोन प्रकारचे भरीत करायची, एक मिठाचे भरीत आणि दुसरे तिखट भरीत. दोन्हीही अप्रतिम लागतात, नक्की करून बघा, तुम्हालाही आवडेल, "वांग्याचे भरीत आणि बाजरीचे रोडगे" !
आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.
रिव्यु सबमिट करा