मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाचा खरवस

Photo of Kharvas by Shraddha Juwatkar at BetterButter
112
1
0.0(0)
0

गुळाचा खरवस

Dec-01-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाचा खरवस कृती बद्दल

गाय म्हैस व्याली रे व्याली की आमची आजी खरवस बनवून काकाना मुंबईला धाडायची व आम्ही मनसोक्त आजीच्या हाताची अप्रतिम चव असलेला खरवस मिटक्या मारत खात असू. आज मी खरवस बनवला पण पूर्वीची ती मजा नाही.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • स्टीमिंग
 • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 6

 1. 1 लिटर दुधाचा चिक
 2. 1 लिटर दुध
 3. अर्धा किलो किसलेला गूळ
 4. आवडीनुसार वेलचीची पूड
 5. 1 चिमूटभर केशर

सूचना

 1. एका पातेल्यात चिक आणि दुध एकत्र करून त्यात गूळ घालावा. गूळ विरघळे पर्यंत ढवळावे. चव पाहून तुम्हाला अजून गोड हवे असल्यास अजून गूळ घालावा.
 2. शेवटी केशर आणि वेलची पूड घालून मिक्स करावे.
 3. आता गॅसवर कुकर ठेवून त्यात तळाशी दीड इंचभर पाणी घालावे. कुकरच्या दोन्ही भांड्यात वरील मिश्रण अर्धे भरून दोन्ही डब्यांवर ताटली ठेवून कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर 2 शिट्ट्या कराव्यात. 
 4. कुकरचे प्रेशर गेल्यावर झाकण काढून दोन्ही डबे बाहेर काढावेत व थंड झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवून थंडगार सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर