मुख्यपृष्ठ / पाककृती / मुगा चा शिरा

Photo of MOONG HALAWA by Jayshree Bhawalkar at BetterButter
541
2
0.0(0)
0

मुगा चा शिरा

Dec-01-2018
Jayshree Bhawalkar
2 मिनिटे
तयारीची वेळ
180 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मुगा चा शिरा कृती बद्दल

ही पाककृती माझ्या आजी ने शिकवलेली रेसिपी आहे.पण आजी बनवायची तेव्हा ती बनवता बनवता फार थकून जायची .मी ह्या पाककृती त नवीन आविष्कार म्हणजे मी ,प्रेशर कुकर चा वापर करून थोडं सोप्प केलं आहे त्या मुळे हा मस्त शिरा लवकर खायला मिळतो.आणखीन एक आयडिया म्हणजे भाजलेलं पिठ फ्रिज मधे 6 महिने ठेवू शकतो आणि हवा तेव्हा साखरे च पाणी घालून मस्त मुगाचा शिरा बनवुन खाऊ शकता .

रेसपी टैग

  • व्हेज
  • कठीण
  • दिवाळी
  • राजस्थान
  • रोस्टिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

  1. 1 कप पिवळी मूग डाळ
  2. 1 कप साजूक तूप
  3. 1 कप साखर
  4. 3 कप पाणी
  5. 3 चमचे काजू,बदाम चे काप
  6. 1 चमचा वेलची पूड

सूचना

  1. डाळ नीट धुवून ,पाण्यात 2 तास भिजत ठेवा
  2. आता पाणी पूर्ण काढून मिक्सर मधे बारीक वाटून घ्या
  3. एका कुकर च्या डब्याला 1/2 चमचा तूप लावून  घ्या केक साठी लावतो तसे आणि आता हे मुगाच वाटलेलं पिठ त्या डब्यात ओतून एका प्लेट नी झाकून कुकर मधे ठेवा आणि शिट्टी लावून 2 शिट्या होऊ द्या.
  4. कूकर थंड झाल्यावर शिजलेल्या पिठ ढोकळा सारख दिसेल त्याचे छोटे तुकडे करून परत मिक्सर मधे फिरवून घ्या.
  5. एका कढईत 1/2कप तूप गरम करा आणि हे वाटलेले,शिजलेले पिठ  त्यात घालून नीट मिक्स करा
  6. आता हे पिठ मंद आंचे वर 10 मिनिट भाजून घ्या.
  7. आता उरलेलं 1/2 कप तूप पण मिक्स करा आणि नीट हालवत पिठ भाजणे सुरू ठेवा
  8. आता गॅस थोडासा मोठा करू शकतो पण सतत हालवत रहायचे आहे.
  9. 10 -15 मिनिटात पिठ तूप सोडू लागेल
  10. पिठा ला गडद कथ्थई रंग येई पर्यंत भाजायचे आहे. ह्याला 20 मिनिट लागतील
  11. आता हे भाजलेले पिठ एका वाडग्यात काढून थंड होऊ द्या.
  12. थंड झाल्यावर परत एकदा मिक्सर मधून वाटून घ्या
  13. एका कढईत 3 कप पाणी त्यात 1 कप साखर घाला आणि मिक्स करा
  14. साखर विरघळून 2 उकळी येऊ द्या.
  15. आपलं भाजून वाटलेलं पिठ ह्यात नीट मिक्स करा
  16. नीट मिक्स करायचे गुठळ्या नाही असल्या पाहिजे
  17. हे मिश्रण 10 मिनिटात घट्ट होई पर्यंत शिजवून घ्या
  18. शिरा घट्ट झाला कि त्यात वेलचीपूड, काजू बदामाचे काप घालून नीट मिक्स करा
  19. एका सर्व्हिंग डिश मधे वरून काजू,बदामाचे काप घालून सजवून आजी चा स्पेशल मुगाचा शिरा  सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर