मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथीचे लाडू

Photo of Methi laddoo by Pratiksha Jadhav at BetterButter
740
2
0.0(0)
0

मेथीचे लाडू

Dec-01-2018
Pratiksha Jadhav
50 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथीचे लाडू कृती बद्दल

मेथीचे लाडू कडू लागतात म्हणून आम्ही खायचाे नाही. मग आजी आमच्यासाठी असे खास लाडू बनवायची ते मला खुप आवडतात आणि थंडीत पाैष्टीक पण आहेत.

रेसपी टैग

  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बारीक रवा 1 किलाे
  2. गुळ 1 किलाे
  3. मेथी 100 ग्राम
  4. अळीव 100 ग्राम
  5. डिंक 100 ग्राम
  6. खसखस 50 ग्राम
  7. काजू 100 ग्राम
  8. बदाम 100 ग्राम
  9. किसलेले सुके खाेबरे 1/4 किलाे
  10. 1 जायफळ पूड करून घेणे
  11. 2 चमचे वेलची पूड
  12. 1/2 किलाे साजूक तुप

सूचना

  1. मेथीची मिक्सरवर पूड करून घ्यावी आाणि अर्धी वाटी तुप पातळ करून त्यात मेथीची पूड 1 दिवस भिजवून ठेवावी म्हणजे कडवटपणा जरा कमी हाेताे.
  2. कढई गरम करत ठेवावी त्यात खसखस काेरडी भाजुन घ्यावी.
  3. अळीव पण काेरडा भाजुन घ्यावा आणि दाेन्हीची जाडसर पूड करून घ्यावी.
  4. कढईत तुप गरम करून काजू, बदाम तळुन घेऊन मिक्सरवर भरड करून घ्यावी.
  5. तुपात डिंक तळुन चुरून घ्यावा.
  6. आता रवा थाेडे तुप टाकुन भाजून घ्यावा
  7. तुप आणि गुळ साेडून सर्व साहित्य एकत्र करून मिक्स करून घ्यावे.
  8. आता एका माेठ्या पातेल्यात 1 वाटी तुप गरम करून त्यात चिरलेला गुळ टाकावा गुळ वितळला की गॅस बंद करावा गुळ फक्त वितळुन घ्यावा पाक करू नये.
  9. वितळलेल्या गुळात मिक्स केलेले साहित्य घालुन चांगले एकत्र करून लाडू वळावेत.
  10. मेथीचे पाैष्टीक लाडू खाण्यासाठी तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर