Photo of Surnoli by Aarti Nijapkar at BetterButter
729
1
0.0(0)
0

सुरनोळी

Dec-01-2018
Aarti Nijapkar
600 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सुरनोळी कृती बद्दल

सुरणोळी ही पाककृती आई बनवते आणि माझ्या आईने तिच्या आजीकडून शिकलेली ही पाककृती आहे थोडी फार कृती आणि पद्धत डोश्यासारखीच पण ही पाककृती चवीला उत्तम आणि पौष्टिक तांदूळ ,पोहे,ओलं खोबरं, गूळ, दही, मेथीदाणे इत्यादी साहित्य वापरून ही कृती केली जाते

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • फेस्टिव
  • महाराष्ट्र
  • रोस्टिंग
  • ब्लेंडींग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदूळ १ वाटी
  2. जाड पोहे १/२ वाटी
  3. ओलं खोबरं १/२ वाटी
  4. गूळ १/२ वाटी
  5. दही १/२ वाटी
  6. मेथीदाणे १/२ लहान चमचा
  7. हळद १ लहान चमचा
  8. मीठ चवीनुसार
  9. तूप आवश्यकतेनुसार

सूचना

  1. तांदूळ स्वच्छ धुवून २ ते ३ तास भिजवून ठेवा
  2. तांदूळ वाटण्याआधी जाडे पोहे ५ मिनिटे भिजत ठेवा पोहे भिजले की त्यातलं पाणी निथळून टाका आणि तांदूळ आणि भिजलेले पोहे एकत्र करून वाटून घ्या
  3. आता त्यात खोबऱ्याचे तुकडे किसलेले ओलं खोबरे , दही, हळद , आणि चवीनुसार मीठ घालून मऊसर मिक्सर मध्ये वाटून घ्या
  4. ३ ते ४ तास झाकून ठेवून द्या
  5. तवा तापवून घ्या मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्या व डोश्यासारखीच पण मध्यम आकाराच्या सुरनळ्या घाला व वर बाजूला थोडे तूप घालून दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्या
  6. गरमागरम सुरनोळी तयार आहे
  7. आम्ही असेच खातो हवं असल्यास चटणी सोबत खाऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर