मुख्यपृष्ठ / पाककृती / मेजीक थालीपीठ

Photo of Magic thalipith by seema Nadkarni at BetterButter
20
1
0.0(0)
0

मेजीक थालीपीठ

Dec-02-2018
seema Nadkarni
45 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेजीक थालीपीठ कृती बद्दल

आजी वेगवेगळ्या प्रकारचे थालीपीठ बनवायची.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 4

  1. 1/4 कप बाजरी चे पीठ
  2. 1/4 कप ज्वारी चे पीठ
  3. 1/4 कप तांदूळ चे पीठ
  4. 1/4 कप मक्याचे पीठ
  5. 1/4 कप बेसन पीठ
  6. 4 चमचा उडदाचे पीठ
  7. 4 चमचा ओट्स ची पावडर
  8. 1/2 कप बारीक चिरलेला कांदा
  9. 1/4 कप किसलेला दुधी भोपळा
  10. 1/4 कप किसलेला गाजर
  11. 2-3 चमचा आले लसुण पेस्ट
  12. 2-2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेली
  13. 1/4 कप दही
  14. 1/4 कप उरलेले आलू मटार ची भाजी
  15. चवी पुरते मीठ
  16. 2 चमचा लाल तिखट
  17. 1 चमचा हळद
  18. बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

  1. सवॅ पीठ एकत्र करून घ्यावे.
  2. त्यात किसलेले दूधी भोपळा, किसलेले गाजर व बारीक चिरलेला कांदा घालावा. बारीक चिरलेली हिरवी मिरची, आले लसुण पेस्ट, दही घालावे.
  3. ऊरलेली आलू मटार ची भाजी पण घालावी.
  4. चवी पुरते मीठ, लाल तिखट, हळद घालून एकत्र करावे व कणीक भिजवून घ्यावे.
  5. 10 मिनिटे झाकून ठेवावे. नंतर त्याचे गोळा घेऊन तव्यावर तेल घालून थापून घ्या. झाकण ठेवून शिजत ठेवावे. कडेला तेल घालून दोन्ही बाजूला भाजून घ्यावी.
  6. खरपूस भाजून घ्यावे.
  7. गरम गरम दही बरोबर किंवा चटणी बरोबर खाल्ले की छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर