Photo of Solkadhi by Deepa Gad at BetterButter
1560
8
0.0(0)
0

सोलकढी

Dec-02-2018
Deepa Gad
0 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

सोलकढी कृती बद्दल

मच्छीचे जेवण असलं की माझी आजी हमखास सोलकढी बनवायची, मांसाहारी जेवण झाले की सोलकढी प्यावी म्हणजे पचन चांगले होते असे माझी आजी म्हणायची, चला तर मग बघू या सोलकढीची रेसिपी

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. कोकम आगळ ३ च
  2. ओले खोबरे १ कप
  3. हिरवी मिरची ३-४
  4. लसूण पाकळ्या ३
  5. जिरे १ च
  6. कोकम ४
  7. साखर १ च
  8. मीठ चवीनुसार
  9. पाणी आवश्यकतेनुसार

सूचना

  1. ओले खोबरे, मिरची, लसूण पाकळ्या, जिरे हे सर्व मिक्सरमध्ये पाणी घालून फिरवा व गाळणीने गाळुन पिळून घ्या
  2. परत चोथा घालुन त्यात पाणी घालून वाटा व गाळणीने गाळुन घ्या हे झाले नारळाचे दूध तयार
  3. त्यात कोकम आगळ घाला, (कोकम आगळ जास्त आंबट असेल तर कोकम घालायची गरज नाही)
  4. कोकम, मीठ, साखर घालून ढवळा
  5. वरून कोथिंबिरीने सजवा, थंड करायला ठेवा
  6. थंडगार सर्व करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर