Photo of Khichadi by Nivedita Walimbe at BetterButter
1259
0
0.0(0)
0

खिचडी

Dec-02-2018
Nivedita Walimbe
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खिचडी कृती बद्दल

माझी आज्जी मुगडाळ तांदूळ खिचडी खूप चविष्ट बनवायची, जोडीला कढी व भाजलेला उडीद पापड, अहाहा सुंदर बेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. तांदूळ एक वाटी भरून,
  2. मुगडाळ अर्धी वाटी,
  3. फोडणी साहित्य,
  4. मेथ्या एक टी स्पून,
  5. गोडा मसाला 2 टेबल स्पून,
  6. थोडे सुके खोबरे,
  7. जिरे एक टेबल स्पून,
  8. मीठ चवीनुसार,
  9. गुळ थोडासा,
  10. कढीसाठी ताक एक वाटी,
  11. मिरची एक, कढीपत्ता सात आठ पाने,
  12. एक टेबल स्पून बेसन pith,
  13. साखर दोन चमचे,
  14. कोथिंबीर बारीक चिरून,
  15. पापड पाच सहा,
  16. साजूक तूप,

सूचना

  1. तांदूळ डाळ एकत्र करून धुवून निथळत ठेवावेत,
  2. जिरे खोबरे मिक्सरमधून बारीक करून घ्यावे,
  3. फोडणी बनवून त्यात मेथ्या टाकाव्या
  4. त्यात निथळत ठेवलेले डाळ तांदूळ घालावे,
  5. चांगले परतून घ्यावे,
  6. त्यात पाणी घालून एक उकळी येऊ द्यावी,
  7. आता त्यात गोडा मसाला, खोबरे जिरे बारीक केलेले, मीठ व गुळ घालावा,
  8. खिचडी मऊसर शिजवून घ्यावी,
  9. वरून कोथिंबीर घालावी
  10. कढीसाठी तुपाची फोडणी करून त्यात जिरे घालावेत, हिंग घालावा
  11. आवडत असल्यास हळद चिमूटभर घालावी,
  12. त्यात मिरची व कढीपत्ता घालावा,
  13. त्यात ताक घालावे,
  14. बेसन पीठ पाण्यात कालवून घालावे,
  15. चवीनुसार मीठ व साखर घालावी,
  16. कढी वर येईपर्यंत उकळू द्यावी,
  17. जास्त उकळू नये.
  18. कोथिंबीर घालावी.
  19. पापड भाजून घ्यावेत.
  20. आता एका प्लेटमध्ये गरम गरम खिचडी, कढी घ्यावी, पापड ठेवावा,
  21. खिचडीवर साजूक तूप घालावे,
  22. व गरम गरम सर्व्ह करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर