मुख्यपृष्ठ / पाककृती / बिर्या

Photo of Birya by Aarti Nijapkar at BetterButter
188
2
0.0(0)
0

बिर्या

Dec-02-2018
Aarti Nijapkar
35 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिर्या कृती बद्दल

हि पाककृती माझ्या आईच्या गावी गेलो की गोड पदार्थ म्हणून हमखास खायला मिळते माझी आजी ही सुगरण आणि तिच्या हाताची चव अप्रतिमच बिर्या हा गोड पदार्थ आहे मैदा , रवा ,तांदूळ पीठ वापरून खमंग भाजून मग वड्याच्या आकारात कापून तुपात सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून साखरेच्या पाकात घोळवून घ्यायचे आणि मस्त खाण्यास तयार मी थोडंस बदल करून त्याच्यात मैद्याच्या ऐवजी नाचणीचे सत्व वापरले आहे व बदाम , काजू , पिस्त्याची भरड घातली आहे आणि साखरेच्या पाका ऐवजी गुळाच्या पाकात घोळवून घेतले आहे

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • रोस्टिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. नाचणीचे सत्व १ वाटी
 2. तांदूळ पीठ १/२ वाटी
 3. रवा १/३ वाटी
 4. तूप १/३ वाटी
 5. जायफळ १/३ लहान चमचा
 6. बदाम काजू पिस्ता भरड १ मोठा चमचा
 7. गुळाचा पाक
 8. गूळ १/२ वाटी
 9. पाणी १/२ वाटी

सूचना

 1. प्रथम कढईत रवा आणि तांदुळाचे पीठ खमंग भाजून घ्या मंद आचेवर मग एका ताटात काढून घ्या
 2. आता त्याच कढईत नाचणीचे सत्व मंद आचेवर खमंग भाजून घ्या
 3. सर्व भाजलेले साहित्य व बदाम , काजू , पिस्त्याची भरड व जायफळ पावडर घालून मिश्रण एकत्र करून घ्या
 4. आता एका भांड्यात घेऊन त्यात तूप घालून व थोडे किंवा आवश्यकतेनुसार पाणी घालून व्यवस्थित एकजीव करून घ्या (भिजवून घ्या)
 5. एका ताटाला तुपाचा हात फिरवून घ्या तयार मिश्रण ताटात घालून पसरवून घ्या मग वड्याच्या आकारात कापा
 6. गॅसवर कढई तापवून तूप घालून गरम करा कापलेली वडी तुपात मंद आचेवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत तळून घ्या
 7. अश्याप्रकारे सर्व वडी तळून घ्या
 8. गुळाचा पाक बनवून घ्या गूळ आणि पाणी एकत्र करून उकळवून घ्या एक तारी किंवा थोडं आटले की गॅस बंद करा
 9. वडी गार झाली की गुळाच्या पाकात घोळवून घ्या
 10. मस्त बिर्या तयार आहे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर