मुख्यपृष्ठ / पाककृती / दुधी चे थालीपीठ.

Photo of Bottle Gaurd Thalipith by Triveni Patil at BetterButter
616
3
0.0(0)
0

दुधी चे थालीपीठ.

Dec-02-2018
Triveni Patil
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुधी चे थालीपीठ. कृती बद्दल

दुधीचे थालीपीठ मी स्वत: आजी जवळ बसुन शिकुन घेतले होते, तेव्हा काही मिक्सर वैगेरे नसायचे पण आजी सर्व वाटण पाट्या वरवंट्यावर करायची शेतातुन मिळेल तो भाजीपाला आणायचा आणी त्यात छान छान आणी पौष्टीक पदार्थ बनवुन आम्हा भावंडाना खाऊ घालायचे त्यातलीच थालीपीठ हा एक पदार्थ चुल्हीवर लोखंडी तव्यावर गरम गरम खरपुस भाजुन घरी काढलेल्या लोणी सोबत खाण्यात जी मजा होती ती काही औरच.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • बेसिक रेसिपी
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. १. एक मिडीयम दुधी किसुन.
  2. २.गव्हाचे पीठ एक वाटी.
  3. ३.ज्वारीचे पीठ एक वाटी.
  4. ४.बेसन अर्धी वाटी.
  5. ५. तांदुळ पीठी अर्धी वाटी.
  6. ६. हि. मिरची,लसुन,आद्रक जिरं ची पेस्ट.
  7. ७.हळद एक टे.स्पुन.
  8. ८.तेल चमचाभर.
  9. ९.मीठ चवीनुसार.
  10. १०.तीळ १. टे.स्पुन.
  11. ११.ओवा १. टे.स्पुन.
  12. १२.कोथिंबीर बारीक चिरून भरपूर.

सूचना

  1. १.दुधी धुवुन साल काढून किसनीवर किसुन पाण्यात बुडवून किस धुवुन घ्या. थोडी दुधी बोटावर घेवुन चल पण चाखुन पहा कडवट तर नाही ना.
  2. २. एका पराती मध्ये दुधीचा किस घेवुन त्यात वरील सगळे साहित्य एकत्र करून छान कणिक मळून घ्यावे. पीठ जरा सैलसर असावे म्हणजे थालिपीठं छान थापता येतात.
  3. ३.हि भिजवलेली कणिक 10 मिनिटं झाकुन ठेवावे. १० मिनीटांनंतर तवा गरम करावा, हाताला पाणी लावून पिठाचा मोठा गोळा घेवुन एका लहान रुमाल घेवुन ओला करावा, त्यावर गोळा ठेवून छान थापून घ्यावे.
  4. ४ तुम्ही ते प्लास्टिकच्या पिशवीवर थापू शकता. मध्यभागी एक छिद्र करावे व आजु बाजुला ४/४ छिद्र करावेत. रुमाल अलगद उचलावा व थालीपीठ गरम तव्यावर टाकावे व रुमाल काढुन घ्यावा.
  5. ५.थालीपीठवर केलेल्या छिद्रां मध्ये आणि आजूबाजूला तेल सोडावे. व छान खरपुस भाजुन घ्यावे. मग थालीपीठ पलटवून दोन्हीकडून छान खरपूस भाजून घ्यावे.
  6. ६.घरचे काढलेले लोणी, दही, कैरीचे लोणचे असा बेत जमवून आणावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर