मुख्यपृष्ठ / पाककृती / कठला मच्छी फ्राय.

Photo of Kathla Fish Fry. by Triveni Patil at BetterButter
1179
2
0.0(0)
0

कठला मच्छी फ्राय.

Dec-02-2018
Triveni Patil
70 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कठला मच्छी फ्राय. कृती बद्दल

आम्ही दिवाळीच्या सुट्टीत मामा च्या गावाला गेलो म्हणजे आजीला आणी मामाला आम्हा भावंडाना काय खाऊ घालु आणी काय नको असे व्हायचे, कारण काय तर शहरा कडची पोर शहरात काय मिळत असेल, तर आजीचा अट्टाहास असायचा जे आही व्हेज, नाँनव्हेज आहे ते ईथंच बनवुन खाऊ घालु आणी मामा सर्व साहित्य आणुन द्यायचा त्यातच हे कठला यच्छी फ्राय पण असायचे. किती तो जिव्हाळा आणी किती ते प्रेम तव्या वरुन सरळ ताटात आणी ताटातून सरळ पोटात मामा स्वतहा माशचे काटे काढुन आम्हाला भरवायचा. नशीब लागत नशिब.

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सोपी
 • इतर
 • महाराष्ट्र
 • शॅलो  फ्रायिंग
 • साईड डिश
 • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 3

 1. १. कठला माशाचे तुकडे अर्धा किलो.
 2. २ . ७/८ लसुन पाकळ्या.
 3. ३. अर्धा इंच आद्रक तुकडा.
 4. ४. १. टि.स्पुन हळद.
 5. ५. १.टि.स्पुन गरम मसाला.
 6. ६. १. टे.स्पुन लाल तिखट.
 7. ७. २. टे.स्पुन कोथिंबीर पेस्ट.
 8. ८. २. टे.स्पुन लिंबाचा रस.
 9. ९. १. वाटी बारिक रवा.
 10. १०. तेल फ्राय करन्यासाठी.
 11. ११. चवी पुरते मीठ.

सूचना

 1. १.प्रथम कठला फिश घेवून त्याला आले लसूण पेस्ट, कोथिंबीर ची पेस्ट मीठ लिंबू रस लावून एक तास मेरिनेट करणे.
 2. २. नंतर लाल तिखट, गरम मसाला, हळद घालून परत १०/१५ मिनीटे मँरिनेट करा.
 3. ३.मग नंतर एका प्लेट मध्ये रवा घेवुन मँरिनेट केलेले माशाचे तुकडे घोळवुन गरम तव्यावर तेल टाकुन माशाचे तुकडे दोन्ही बाजूंनी खरपूस तळुन घेणे.
 4. ४. एका प्लेट मध्ये फ्राय केलेले फिश तुकडे घेवून त्यावर चाट मसाला घालून लिंबु पिळुन सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर