मुख्यपृष्ठ / पाककृती / चिंबोरी मसाला ( काळ्या मसाल्यातील खेकडा)

Photo of Crab Curry with Black Gravy by Tejashree Ganesh at BetterButter
135
0
0.0(0)
0

चिंबोरी मसाला ( काळ्या मसाल्यातील खेकडा)

Dec-02-2018
Tejashree Ganesh
30 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चिंबोरी मसाला ( काळ्या मसाल्यातील खेकडा) कृती बद्दल

ताजी चिंबोरी मिळाली की आजी कधी लाल मसाल्याची तर कधी काळ्या मसाल्याची करत असे, त्यातील काळ्या मसाल्याची चिंबोरी रेसिपी. One of the Best Recipes of my Granny.

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • मध्यम
 • डिनर पार्टी
 • महाराष्ट्र
 • मेन डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

 1. ताजी चिंबोरी २
 2. कांदा १ मोठा उभे कापून
 3. खोबरं १/२ वाटी किसून (मी खोबरं पावडर वापरली आहे)
 4. आलं २ ईंच तुकडे करून
 5. लसून १०-१२ पाकळ्या तुकडे करून
 6. धने २ चमचे
 7. मिरे ३-४
 8. तमालपत्र १-२
 9. लवंगा २-३
 10. लाल सुक्की मिरची २-३
 11. लाल तिखट १ चमचा
 12. मिठ
 13. हळद
 14. आमसुलाची चटणी २ चमचे
 15. पाणी
 16. तेल
 17. कोथिंबीर
 18. पुदिना
 19. लिंबू

सूचना

 1. चांगल्या प्रतिची चिंबोरी घेतली.
 2. चिंबोरीच्या नांग्या व धड वेगळे वेगळे करून घेतले.
 3. आता ही चिंबोरी स्वच्छ करून घेतली. बारिक नांग्या मिक्सरमधे टाकल्या.
 4. पाणी टाकून मिक्सरमधून बारिक करून घेतली व गाळून एका भांड्यात बारिक गर बाजूला काढला. राहिलेले जाड भाग फोकून दिले.
 5. सर्व मसाला एका ताटात बाजूला काढून घेतला.
 6. एकीकडे गॅसवर एक कढईत तेल टाकले त्यात वरील मसाला टाकला. सर्व मसाला चांगला परतून घेतला.
 7. आता ह्यात कांदा टाकला व पुन्हा व्यवस्थित परतून घेतले.
 8. नंतर खोबरं, आर्धे आलं व लसून तुकडे टाकून परतून घेतले.
 9. सर्व मसाला चांगला परतून होईपर्यंत दुस-या बाजूला एक पातेल्यात पाणी गरम करायला ठेवले, त्यात उरलेले आलं लसून तुकडे व ३-४ कांद्याचे काप टाकले. चिंबोरीच्या पाठी ह्या पाण्यात चांगल्या उकळत ठेवल्या.
 10. उकळून झाल्यानंतर
 11. कांदा, खोबरं मसाला आता चांगला परतला गेला त्यातच हळद, मिठ व मिरची पुड टाकून एकत्र केला.
 12. तो थोडा थंड झाला की मिक्सरमधे बारिक वाटून घेतला.
 13. त्याच कढईमधे तेल टाकून, तेल गरम झाले की वाटलेला मसाला टाकला.
 14. मसाला तेलात चांगला परतून घेतला. आमसुलाची चटणी टाकली व एकत्र करून घेतले.
 15. चिंबोरीसाठी काळा मसाला तयार झाला.
 16. ह्यात चिंबोरी टाकून परतून घेतली.
 17. नांग्यांचा गर चिंबोरीच्या कालवनात ओतून एकत्र करून घेतले.
 18. तसेच दुस-या भांड्यात चिंबोरीच्या पाठीचे पाणी ठेवले ते पाणी कढईतच टाकले.
 19. झाकण ठेवून शिजू दिले.
 20. रस्सा जसा हवा तसा ठेवला. (पातळ हवे असेल तर पाणी टाकावे)
 21. चुलिवरच्या कालवनाचा सुगंध यावा म्हणून smoke दिला. ह्यासाठी एक-दोन कोळसे तापवावेत, ते एका छोट्या प्लेटमधे किंवा वाटीत ठेवाव, ही वाटी भाजीवर ठेवावी व त्यावर तेल आतावे, धूर येऊ लागला की झाकण ठेवावे. ५ मि. झाकण काढू नये.
 22. कोथिंबीर, कांदा व लिंबू ने garnish करून platting केले. हे कालवन तांदळाच्या भकरीसोबत अप्रतिम लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर