मुख्यपृष्ठ / पाककृती / ओल्या हळदी चा शिरा

Photo of Fresh Turmerik Halwa by जयश्री भवाळकर at BetterButter
0
3
0(0)
0

ओल्या हळदी चा शिरा

Dec-02-2018
जयश्री भवाळकर
3 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ओल्या हळदी चा शिरा कृती बद्दल

ही पाककृती माझ्या आजी ची आहे.ती थंडीत ओली हळद बाजारात दिसली कि हा शिरा बनवायची.ती सांगायची हा शिरा कशा ही तर्हे च्या दुखण्यावर, सर्दी खोकल्यावर औषधी असतो. मी ह्यात नवीन जमान्याचा ट्वीस्ट घातला आहे.तो ट्वीस्ट असा कि शिऱ्यात घातलेला मावा दूध पावडर नी पटकन बनवला आहे.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • टिफिन रेसिपीज
 • गुजरात
 • सिमरिंग
 • स्टीमिंग
 • सौटेइंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. 100 ग्राम ओली हळद
 2. 50 ग्राम साखर
 3. 1/4 कप घरची साय
 4. 1/2 कप दूध पावडर
 5. 4 वेलची चे दाणे
 6. 2 चमचे साजूक तूप
 7. 1/4 कप अर्धे केले ले काजू

सूचना

 1. साहित्य एकत्र ठेवा
 2. एका कढईत तूप घालून गरम करा आणि काजू तुकडा तळून घ्या
 3. ओली हळद किसून घ्या आणि 2 चमचे तूप पण घ्या
 4. आता ह्याच तुपात किसलेली ओली हळद घाला आणि शिजवा
 5. हळद शिजलेली की साखर घालून शिजवा आणि बाजूला ठेवा
 6. आता एक दुसरं पॅन घेऊन त्यात साय आणि दूध पावडर मिक्स करा
 7. आटवून मावा तैयार करा
 8. आता साखर घालून शिजवलेली हळद वाली कढईत तैयार मावा घालून मिक्स करा आणि 2 मिनिट आंचेवर आटवून घ्या
 9. आता तळलेले काजू घालून मिक्स करा.
 10. चविष्ट ओल्या हळदीचा शिरा सर्व्हिंग प्लेट मधे काजू आणि एक चिमूट कच्ची ओली हळदी नी सजवून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर