मुख्यपृष्ठ / पाककृती / पेरू चे पंचामृत

Photo of Guava Panchanamrut by Jayshree Bhawalkar at BetterButter
359
2
0.0(0)
0

पेरू चे पंचामृत

Dec-02-2018
Jayshree Bhawalkar
2 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पेरू चे पंचामृत कृती बद्दल

ही पाककृती थंडीतली पारंपरिक रेसिपी आहे.माझी आजी थंडीत आवर्जून बनवायची .मी शाळेत असताना डब्यात पराठा सोबत न्यायची.मी ह्यात एकच ट्वीस्ट दिला आहे कि नुसता गूळ न घालता गुळ आणि साखर दोन्ही घातले आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सिमरिंग
  • स्टीमिंग
  • सौटेइंग
  • अकंपनीमेंट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. 2 मोठे पेरु
  2. 1/4 कप गुळ
  3. 1/4 कप साखर
  4. 1 चिमूट हळद
  5. 1/2चमचा जिरे
  6. 1/2 चमचा बडीशेप
  7. 1 मोठा चमचा लाल तिखट
  8. 1/4 चमचा काळी मिरी पावडर
  9. 1/4 चमचा काळ मिठ
  10. 1/2 चमचा सेंधव मिठ
  11. 1/4 चमचा भाजकी जिरेपूड
  12. 2 चमचे तेल

सूचना

  1. पेरू चोप्पर नी कापून घ्या आणि सगळे साहित्य एकत्र ठेवा
  2. एका कढईत तेल गरम करून जिरे, बडीशेप आणि घालून  फोडणी तैयार करा
  3. आता ह्या फोडणीत पेरू च्या फोडी घालून मिक्स करा आणि शिजवून घ्या
  4. आता गुळ, साखर टाकून साखरे च  पाणी आटे पर्यंत शिजवा
  5. आता दोन्ही मिठ आणि बाकी सगळे मसाले मिक्स करून 2 मिनिट अजून शिजवून घ्या.
  6. आपला मस्त चटकदार पेरू चा पंचामृत कोथिंबीर च पान आणि पेरू च्या फोडीनी सजवून सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर