कांदा-टोमॅटोतली सुकट | Dry fish in Onion and Tomato Recipe in Marathi

प्रेषक Tejashree Ganesh  |  2nd Dec 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Dry fish in Onion and Tomato by Tejashree Ganesh at BetterButter
कांदा-टोमॅटोतली सुकटby Tejashree Ganesh
 • तयारी साठी वेळ

  15

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  25

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

3

0

About Dry fish in Onion and Tomato Recipe in Marathi

कांदा-टोमॅटोतली सुकट recipe

कांदा-टोमॅटोतली सुकट बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Dry fish in Onion and Tomato Recipe in Marathi )

 • सुकट १ कप
 • कांदा १
 • टोमॅटो २-३
 • लाल तिखट
 • हळद
 • लाल मसाला / घरचा कुठलाही मसाला
 • ओलं खोबरं खवून १/२ कप
 • मिठ
 • तेल
 • पाणी

कांदा-टोमॅटोतली सुकट | How to make Dry fish in Onion and Tomato Recipe in Marathi

 1. प्रथम सुकट निवडून, पाखडून स्वच्छ करावी.
 2. सुकट भाजून घेतली.
 3. नंतर एका बाजूला पाणी तापत ठेवले.
 4. पाणी तापल्यावर त्यात सुकट टाकावी.
 5. व ५ मि. नंतर गरम पाण्यातून काढून निथळत ठेवावी.
 6. कांदा,टोमॅटो, आलं,लसून बारिक चिरून घ्यावे.
 7. दुसरीकडे एका जाडबुडाच्या कढईमधे तेल टाकाले.
 8. त्यात कांदा चांगला परतून घ्यावा , आलं-लसून पेस्ट टाकून चांगले एकजीव करून घ्यावे.
 9. बाजूला तेल सुटले की मग टोमॅटो टोकावे.
 10. टोमॅटो झाकण ठेवून २-३ मि. चांगले शिजू द्यावे.
 11. नंतर ह्यात मिठ,हळद टाकावे. व चांगले एकजीव करून घ्यावे.
 12. मिरचीपुड,मसाला टाकला
 13. खवलेले खोबरं टाकले
 14. वरिल मिश्रणात बाजूला ठेवलेली सुकट टाकून पुन्हा व्यवस्थित परतून घ्यावे.
 15. झाकण ठेवून शिजू द्यावे. शिजले की कालवन असे दिसते.
 16. कोथिंबीर टाकून garnish करावे
 17. गरम गरम तांदळाच्या भाकरी सोबत किंवा पोळी सोबत serve करावे.

My Tip:

ह्या भाजीकरिता कुठलीही सुकी मासळी वापरता येते, माझी आजी बोंबील वापरत असे पण मला बोंबील मिळत नसल्याने कोळंबी वापरली.

Reviews for Dry fish in Onion and Tomato Recipe in Marathi (0)