मुख्यपृष्ठ / पाककृती / तिळ-गुळ पोळी

Photo of Til-Gul Poli by Tejashree Ganesh at BetterButter
41
0
0.0(0)
0

तिळ-गुळ पोळी

Dec-02-2018
Tejashree Ganesh
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तिळ-गुळ पोळी कृती बद्दल

फक्त संन्क्रांतीलाच नव्हा तर हिवाळा लागला की आजी ही तिळ-गुळ पोळी करायची, आम्ही शाळेला डब्यात न्यायचो.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • महाराष्ट्र
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. गुळ १ वाटी किसून
 2. डाळीचे पिठ १/४ वाटी
 3. तिळ २ चमचे
 4. वेलची पुड
 5. जायफळ पुड
 6. गव्हाचे पिठ २ वाट्या
 7. तेल
 8. तुप

सूचना

 1. प्रथम गुळ किसून घेतला.
 2. तिळ खमंग भाजून घेतले.
 3. डाळीचे पिठ एका कढईमधे खमंग भाजून घेतले.
 4. तिळ, गुळ, भाजलेले डाळीचे पिठ, वेलची पुड, जायफळ पुड सर्व एकत्र केले.
 5. चांगले मळून एकजिव केले.
 6. गव्हाचे पिठ एका भांड्यात घेतले व त्यात मिठ व कडकडीत तापलेल्या तेलाचे मोहन घातले.
 7. कणीक मळून घेतली.
 8. आता ह्या कणकेचा छाटा गोळा घेतला, तो पोळपाटावर लाटला व ती पोळी बाजूला ठेवली.
 9. दुसरा गोळा घेतला तोही लाटला
 10. त्यावर तिळ-गुळाचे सारण टाकले व एकदा हलकेसे लाटणे फिरवून घेतले.
 11. त्यावर प्लेट मधील दुसरी पोळी ठेवली.
 12. सर्व बाजूंनी कडा दाबून घेतल्या व पुन्हा एकदा हलकेसे लाटणे फिरवले.
 13. गॅसवर तवा तापत ठेवला व तवा तापला की त्यावर ही पोळी सावकाश उचलून टाकली.
 14. दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घेतली. व तूप लावले.
 15. ही पोळी साजूक तुपाबरोबर गरम गरम serve करताता किंवा खाण्यस वेळ असेल तर एखाद्या hot pot मधे ठेवली तरीही चालते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर