मुख्यपृष्ठ / पाककृती / चुर्म्याचे लाडू

Photo of Churma Laddoo by Tejashree Ganesh at BetterButter
39
2
0.0(0)
0

चुर्म्याचे लाडू

Dec-02-2018
Tejashree Ganesh
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

चुर्म्याचे लाडू कृती बद्दल

हे लाडू माझ्या आजीच्या food diary मधून.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स रेसिपीज
 • राजस्थान
 • फ्रायिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

 1. गव्हाचे पिठ २ कप
 2. रवा २ चमचे
 3. तुप दिड ते २ कप
 4. गुळ 1 कप
 5. दुध आवश्यकतेनुसार
 6. सुकामेवा
 7. वेलचीपुड

सूचना

 1. गव्हाचे पिठ, रवा व १/२ कप तुप एकत्र करून घेतले.
 2. दुध टाकून पीठ मळून गोळा बनवून २०-२५ मि. बाजूला ठेवला.
 3. मोठ्या गोळ्यापासून लहान लहान चकत्या बनवून घेतल्या.
 4. गॅसवर कढईमधे तेल तापवून त्यात ह्या चकत्या तळून घेतल्या.
 5. तळलेल्या चकत्या किचन टॉवल वर काढल्या व त्याचे जास्तिचे तुप निघून जाऊ दिले.
 6. हे सर्व मिक्सरमधून रवाळ बारिक करून घेतले.
 7. ह्यामधे सुकामेवा मिक्स करून घेतला.
 8. वेलचीपुड घातली व मिश्रण बाजूला ठेवले.
 9. गॅसवर जाड बुडाच्या पातेल्यात तुप व गुळ वितळून घेतले.
 10. हे त्या रवाळ मिश्रणात ओतले व पटापट लाडू वळून घेतले.
 11. हे लाडू ४-५ दिवस हवाबंद डब्यात चांगले राहतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर