मुख्यपृष्ठ / पाककृती / आजीच्या हातची खुसखुशीत तिळाची करंजी

Photo of Sesame seeds Karanji by Shraddha Juwatkar at BetterButter
50
0
0.0(0)
0

आजीच्या हातची खुसखुशीत तिळाची करंजी

Dec-02-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
120 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आजीच्या हातची खुसखुशीत तिळाची करंजी कृती बद्दल

दिवाळीत आमची आई नेहमी पारंपारिक रव्या खोबरयाच्या करंज्या बनवायची पण दिवाळी संपून थंडीची चाहूल लागताच आमची आजी आमच्यासाठी तिळाची करंजी बनवायची. आजीने बनवलेली करंजी इतकी खुसखुशीत असायची अगदी बेकरी मधल्या बिस्किटां सारखी लागायची.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम

साहित्य सर्विंग: 10

 1. गव्हाचे पीठ - अंदाजे १ वाटी
 2. किसलेले सुके खोबरे 1 कप
 3. तीळ 1 कप
 4. पिठी साखर पाऊण कप
 5. वनस्पती तूप 2 टेबलस्पून
 6. मैदा 2 वाटी
 7. बारीक रवा 2 टेबलस्पून
 8. तेल
 9. सुकामेवा वेलचीची व जायफळ पूड

सूचना

 1. मैदा आणि बारीक रवा व किंचित मीठ एकत्र करून कडकडीत वनस्पती तूपाचे मोहन घालून घट्ट भिजवावे व एक तास झाकून ठेवावे.
 2. कढईत तूप गरम करून गव्हाचे पीठ चांगले खमंग रंग बदले पर्यंत भाजून घ्यावे व बाजूला काढून ठेवावे त्याच कढईत सुके खोबरे चांगले परतून घ्यावे व तीळही परतून घ्यावे आणि सुका मेवा परतून गॅस बंद करावा.
 3. मिश्रण थंड झाल्यावर त्यात पिठी साखर व वेलची जायफळ पूड टाकून एकत्र करून घ्यावे.
 4. एक तासानंतर पीठाचे मध्यम आकाराचे गोळे करावेत. त्याच्या पुऱ्या लाटून ठेवाव्या. 
 5. पुरीच्या मध्यावर सारण ठेवून कडेला दूध किंवा पाणी लावून तिची घडी घालावी. कडा एकमेकांवर जोडून बोटानी दाबून चिकटवाव्या.
 6. करंजीच्या चमच्याने आकार देऊन सगळ्या करंज्या करून झाल्यावर तेलात मंद आचेवर सोनेरी रंगावर तळून घ्यावेत

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर