मुख्यपृष्ठ / पाककृती / पौष्टिक डिंकाचे लाडू

Photo of Dink ladoo by Rohini Malwade at BetterButter
86
4
0.0(0)
0

पौष्टिक डिंकाचे लाडू

Dec-03-2018
Rohini Malwade
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पौष्टिक डिंकाचे लाडू कृती बद्दल

लहाण्यापासून ते वृद्धांपर्यंत सगळ्यांना खाता येतील आणि खूपच पौष्टिक असे डिंकाचे लाडु.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • रोस्टिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. 150gm खारीक(कुटून बिया काढून मिक्सरमध्ये पूड केलेली)
 2. 150gm सुक्या खोबऱ्याचा किस
 3. 250gm पिठीसाखर/गुळ
 4. 100gm काजू
 5. 100gm बदाम
 6. 100gm अक्रोड
 7. 100 gm मनुका
 8. 150gm डिंक
 9. 50 gm खसखस
 10. 2 टेबलस्पून विलायची पूड
 11. 250gm साजूक तूप
 12. जायफळ पूड आवडीनुसार

सूचना

 1. 1:- सगळ्यात पहिले गॅसवर कढईमध्ये खसखस, सुके खोबरे, काजू, बदाम, अक्रोड वेगवेगळे 2मिनिट भाजून घ्या.
 2. 2- नंतर त्याच कढईत अर्धे तूप घालून चांगले गरम करा आणि त्यात मनुके छान तळून घ्या मनुके फुलले की काढून घ्या . 3- नंतर डिंक पण छान फुलवून घ्या. 4- आता राहिलेल्या तुपात खारीक पूड पण 1 मिनिट भाजून घ्या आणि सर्व साहित्य थंड करून घ्या. 5- आता मिक्सर मध्ये खसखस बारीक करून पूड बनवा.तसेच काजू,बदाम,अक्रोड ची पण पूड बनवा. 6- डिंक पण मिक्सर मध्ये बारीक करून घ्या.(किंवा हातांनी चुरून घ्या) 7-आता सर्व साहित्य मिक्स करा खोबरे पण हातांनी चुरून मिक्स करा. 8- आता त्यात पिठीसाखर घाला आणि परत मिक्स करा. 9- लाडू वळण्यासाठी तूप पातळ करून थोडे थोडे घाला. 10- आणि आता छोटे छोटे लाडू बनवा. 11- हे लाडू 1 महिना घट्ट झाकणाच्या डब्ब्यात ठेवा छान राहतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर