मुख्यपृष्ठ / पाककृती / कढीपत्ता चटणी

Photo of Curry Leaves Chutney by Shraddha Juwatkar at BetterButter
1410
3
0.0(0)
0

कढीपत्ता चटणी

Dec-04-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कढीपत्ता चटणी कृती बद्दल

बहुगुणी आणि आरोग्यसंपन्न कढीपत्ता आहारात नियमित असावा. हिवाळ्यात ही चटणी नक्की बनवून बघा पचनास खूपच चांगली आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • लोणचं / चटणी वगैरे
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 6

  1. कढीपत्ता पाने एक मोठी वाटी 
  2. उडीद डाळ मुठभर
  3. फुटाण्याची डाळ पाव वाटी 
  4. किसलेले सुके खोबरे २ चमचे 
  5. लाल सुक्या मिरच्या २ किंवा लाल तिखट
  6. जीरे लहान अर्धा चमचा 
  7. तीळ एक मोठा चमचा
  8. चवीनुसार मीठ
  9. किंचित साखर

सूचना

  1. प्रथम कढीपत्ता स्वच्छ धुवून टाँवेलवर पसरून कोरडा करावा
  2. आता गँसवर कढई ठेवून एक चमचा तेल घालून उडीद डाळ व फुटाण्याची डाळ वेगवेगळे तांबूस भाजून घ्यावे व एका ताटात काढुन घेणे.
  3. नंतर लाल मिरची, कढीपत्ता पाने व जीरे, तीळ भाजून घ्यावे. कढीपत्ता एकदम कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यावा.
  4. भाजलेले पदार्थ थंड झाल्यानंतर मीठ व किंचित साखर घालून सर्व साहित्य मिक्सरमधे वाटावे
  5. भाकरी, पोळी किवा वरण-भातासोबत सुध्दा ही चटणी तोंडी लावायला मस्तच लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर