मुख्यपृष्ठ / पाककृती / झटपट आवळयाचा गुळांबा

Photo of Instant Amla Chunda by Shraddha Juwatkar at BetterButter
50
4
0.0(0)
0

झटपट आवळयाचा गुळांबा

Dec-05-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

झटपट आवळयाचा गुळांबा कृती बद्दल

आवळा हे तुरट व आंबट चवीचे हिवाळ्यात येणारे एक अत्यंत औषधी फळ आहे .आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. आवळयाचे बरेचसे साठवणीचे पदार्थ करून वर्षभर त्याचे सेवन करू शकतो

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • लोणचं / चटणी वगैरे
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

 1. अर्धा किलो आवळे
 2. आवळयाचा किस 2 वाट्या तर तितकाच किसलेला गूळ
 3. 2 लवंगा

सूचना

 1. आवळे स्वच्छ धुवून कपड्याने पुसून कोरडे करून किसावे.
 2. किसलेले आवळे वाटीने मोजून जितका किस तितकेच गूळ चिरून घ्यावा.
 3. स्टीलच्या पातेल्यात आवळयाचा किस व गूळ एकत्र करून गॅसवर शिजत ठेवावे.
 4. गूळ वितळला की गॅस मंद आचेवर करून त्यात लवंगा घालून सारखे ढवळत रहावे. किस शिजत आली की गुळांबा घट्ट होत जातो व रंग ही सुरेख येतो.
 5. गुळांबा जास्त आटवून देता थोडा रसरशीतच ठेवावा व गॅस बंद करावा.
 6. थंड झाल्यावर एका काचेच्या बरणीत भरून ठेवावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर