मुख्यपृष्ठ / पाककृती / गुळाचा गाजर हलवा

Photo of Jaggery Carrot Halwa by Shraddha Juwatkar at BetterButter
1775
3
0.0(0)
0

गुळाचा गाजर हलवा

Dec-05-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गुळाचा गाजर हलवा कृती बद्दल

हिवाळ्याच्या गुलाबी थंडीत लालबुंद गाजरांची बाजारात लयलूट असते. नेहमी आपण साखर वापरून हलवा बनवतो पण मी आज गूळ घालून हलवा बनवला खूपच पौष्टिक आणि चविष्ट झाला.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • डेजर्ट

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा किलो लालबुंद गाजर
  2. गूळ 300 ग्राम
  3. दुधाची पावडर 4टेबलस्पून
  4. तूप 2 टेबलस्पून
  5. बदाम,काजूचे काप व किशमिश आवडीनुसार
  6. वेलचीची पूड 1 टेबलस्पून

सूचना

  1. आधी गाजर स्वछ धूवून पुसून त्याची साल पीलरने काढून किसणीने किसून घेणे.
  2. पॅन मध्ये तूप गरम करावे व बदाम काजू किशमिश घालून हलके परतून घेणे व बाजुला काढून ठेवावे. त्याच पॅन मध्ये किसलेले गाजर घालून व्यवस्थित परतून घ्यावे.
  3. 5/6 मिनिटे परतून झाल्यावर झाकण ठेवून एक वाफ काढावी व गूळ घालून चांगले एकजीव करुन घ्यावे .
  4. गूळ वितळला की दुधाची पावडर घालून खमंग परतावे आणि वेलचीची पूड व भाजलेला सुकामेवा घालून हलवा घट्टसर होईपर्यंत परतून घेणे.
  5. गरम किंवा गार झाल्यावर हलवा सर्व्ह करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर