मुख्यपृष्ठ / पाककृती / गाजराची कोशिंबीर

Photo of Carrot Salad by Shraddha Juwatkar at BetterButter
34
1
0.0(0)
0

गाजराची कोशिंबीर

Dec-06-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गाजराची कोशिंबीर कृती बद्दल

हिवाळ्यात गाजर भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात. गाजराचे भरपूर पदार्थ आपण करतो. त्यातलाच एक पदार्थ म्हणजे गाजराची कोशिंबीर.जेवताना तोंडीलावणी म्हणून हि कोशिंबीर छान लागते.

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • लोणचं / चटणी वगैरे
 • लो कॅलरी

साहित्य सर्विंग: 4

 1. 1 वाटी गाजराचा किस
 2. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 3. 1 टीस्पून लिंबाचा रस
 4. 2 टेबलस्पून शेंगदाणेचा कूट
 5. चवीनुसार मीठ व साखर
 6. 1 टेबलस्पून तेल किंवा तूप
 7. 1 टीस्पून मोहरी,जीरे
 8. चिमूटभर हिंग
 9. सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर

सूचना

 1. गाजर स्वछ धूवून पुसून किसून घ्यावे
 2. किसून झाले की त्यात मीठ साखर व लिंबाचा रस घालून हलक्या हाताने ढवळून घ्यावे व पाच मिनिटे झाकून ठेवावे.
 3. आता त्यात शेंगदाणे कूट घालून चांगले एकजीव करुन घ्यावे .
 4. फोडणी साठी तेल किंवा तूप गरम करून त्यात मोहरी जिरे हिरव्या मिरच्या व हिंग घालून मस्त फोडणी करावी व कोशिंबीर वर घालून चांगले मिक्स करून घेणे.
 5. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून जेवताना सर्व्ह करावे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर