मुख्यपृष्ठ / पाककृती / बीटच्या देठांची कढी

Photo of BEETROOT kadhi by minal sardeshpande at BetterButter
1260
3
0.0(0)
0

बीटच्या देठांची कढी

Dec-07-2018
minal sardeshpande
20 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बीटच्या देठांची कढी कृती बद्दल

आत्ता हिवाळ्यात बीट अगदी छान पाल्यासह मिळतात. त्याच्या पाल्याची भाजी करून उरलेले देठ कढी साठी वापरलेत

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • इतर
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. बीट चे देठ एक वाटी
  2. ताक दोन वाट्या
  3. ओलं खोबरं अर्धी वाटी
  4. साखर दोन चमचे
  5. मीठ
  6. जीरं पाव टीस्पून
  7. हिंग चिमूटभर
  8. कढीलिंब पाने चार
  9. मिरच्या ओल्या दोन
  10. लसूण दोन पाकळ्या
  11. तूप दोन टीस्पून
  12. बेसन दोन टीस्पून

सूचना

  1. बीट चे देठ धुवून सोलून घ्या.
  2. लसूण सोला
  3. मिरची धुवा आणि तुकडे करा.
  4. देठ वाफवून किंवा तसेच घ्या.
  5. साहित्य
  6. देठ, खोबरं, लसूण, मिरच्या मिक्सरमध्ये फिरवा.
  7. एक वाटी पाणी घाला.
  8. गाळणीने पातेल्यात गाळून घ्या. परत एकदा चोथा पाणी घालून फिरवा.
  9. त्यात मीठ, साखर, मिसळा
  10. ताकात बेसन मिक्स करा, गुठळ्या राहू देऊ नका.
  11. तुपाची जीरं आणि हिंग घालून फोडणी करा.
  12. फोडणी आणि कढीलिंब घालून छान गरम करा.
  13. गरमागरम कढी प्या किंवा भातासोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर