मुख्यपृष्ठ / पाककृती / बटर चकली

Photo of BUTTER Chakali by Suchita Wadekar at BetterButter
26
3
0.0(0)
0

बटर चकली

Dec-07-2018
Suchita Wadekar
10 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
10 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बटर चकली कृती बद्दल

हिवाळा असल्यामुळे तळलेले पदार्थ खाल्ले तरी त्याचे व्यवस्थित पचन होते, त्यामुळे असे पदार्थ हिवाळ्यात केले जातात. दिवाळी पासून खऱ्या अर्थाने थंडीला सुरुवात होते आणि थंडीचे स्वागत या तळलेल्या पदार्थानी केले जाते. या पदार्थातील सगळ्यांच्या आवडीची असेल तर ती म्हणजे "चकली". या चकल्यांचेही वेगवेगळे प्रकार आहेत, कुणी भाजणीची करते तर कुणी पीठ वाफवून करते. चकली बनवणं हि एक कला आहे ती जीला जमली ती खरी सुगरण आहे असं खात्रीने म्हणायला हवं असं मला मनापासून वाटतं. सुरुवातीला माझीही चकली नेहमी बिघडे, त्यामुळे चकली करायची मला भीती वाटत असे. कधी मऊ पडे तर कधी विरघळे. एकदा असेच माझ्या बहिणीबरोबर याविषयी बोलणे झाले तेव्हा तिने मला सोपी रेसिपी सांगितली होती, त्याप्रमाणे मी चकली बनवली आणि सुंदर झाली. थँक्स ताई! :blush: यावर्षी दिवाळीत म्हटले चला थोडा चेंज म्हणून बटर चकली करून बघुयात म्हणून मग यात लाल तिखट अगदी नावाला घातले आणि थोडा तिखटपणा यावा म्हणून मिरी पावडर घातली आणि चकली बनवली. अतिशय सुंदर झाली होती, पण थोडीच बनवल्यामुळे लगेच संपली. आता माझ्या मुलीच्या आग्रहामुळे पुन्हा बनवली. हिवाळा असल्यामुळे चालता है बॉस .... :thumbsup:

रेसपी टैग

 • व्हेज
 • सोपी
 • दिवाळी
 • महाराष्ट्र
 • फ्रायिंग
 • स्नॅक्स
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 10

 1. ● 2 वाटी तांदळाचे पीठ
 2. ● 1 वाटी पंढरपुरी डाळे
 3. ● अर्धी वाटी पोहे
 4. ● 50 ग्राम अमूल बटर (अडीच चमचे)
 5. ● आवश्यकतेनुसार मीठ
 6. ● 1 चमचा मिरी पावडर
 7. ● 2 चमचे तीळ
 8. ● अर्धा चमचा लाल तिखट

सूचना

 1. प्रथम मिक्सरला पंढरपुरी डाळे बारीक करावेत आणि पोहे थोडेसे गरम करून मिक्सरला बारीक करावेत.
 2. यानंतर एका भांड्यात तांदूळ पीठ, डाळे पीठ, पोहे पीठ एकत्र घ्यावे, यात बटर, तीळ, लाल तिखट, काळी मिरी पावडर, मीठ घालावे व पाणी घालून मळून घ्यावे.
 3. यानंतर गॅसवर कढईत तेल तापत ठेवावे. तेल तापल्यावर गॅस बारीक करावा व सोऱ्याच्या सहाय्याने चकल्या बनवाव्यात.
 4. मध्यम आचेवर तळाव्यात.
 5. आपली बटर चकली तैयार !

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर