मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी तीळ टिक्की

Photo of Methi Til Tikkis by Shraddha Juwatkar at BetterButter
558
3
0.0(0)
0

मेथी तीळ टिक्की

Dec-07-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी तीळ टिक्की कृती बद्दल

हिवाळ्यात मुलांना जास्त भूक लागते. मेथीची भाजी खाताना लहान मुले नाक मुरडतात पण अशा प्रकारे टिक्की केली तर नक्कीच खुश होतील.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. अर्धा कप बारीक चिरलेली मेथी
  2. उकडून किसलेले बटाटे 2 कप
  3. हिरव्या मिरच्या व आले पेस्ट 1 टेबलस्पून
  4. 1 टीस्पून लाल तिखट
  5. 1 टीस्पून गरम मसाला पावडर
  6. 1/2 टीस्पून जिरे पूड
  7. 1/2 टीस्पून आमचूर पावडर किंवा चाट मसाला
  8. चवीनुसार मीठ
  9. तेल
  10. 1 वाटी सफेद तीळ
  11. 2 टेबलस्पून मैदा व पाणी

सूचना

  1. उकडलेले बटाटे किसून घ्यावे व मेथी स्वछ धूवून बारीक चिरावी.
  2. पॅन मध्ये 1 टेबलस्पून तेल गरम करून त्यात आले व मिरची पेस्ट घालून परतावे व मेथी घालून पाच मिनिटे मंद आचेवर कच्चा वास जाये पर्यंत ढवळावे.
  3. आता त्यात बटाटा किस व सर्व मसाले घालून चांगले एकजीव करून घ्यावे. मीठ घालावे व छान खमंग परतून झाले की गॅस बंद करून मिश्रण थंड करण्यास बाजूला ठेवावे.
  4. मिश्रण थोडे थंड झाल्यावर हाताला तेल चोळून मिश्रणाचा एक एक गोळे करून गोल टिक्की चा आकार दयावा.
  5. एका बाऊल मध्ये मैदा घेऊन त्यात थोडे पाणी घालून भजी ला बनवतो तशी पेस्ट करा. हयामुळे टिक्की खूपच खुसखुशीत होतात.
  6. तयार केलेल्या टिक्की मैद्याच्या पेस्ट मध्ये घोळवून दोन्ही बाजूंनी तीळ लावून गरम तेलात सोनेरी रंगावर शॅलो फ्राय करून घ्यावे.
  7. गरमागरम मेथी तीळ टिक्कीज पुदिन्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस सोबत सर्व्ह करणे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर