मुख्यपृष्ठ / पाककृती / बारीक मेथीची भाजी

Photo of Baby Fenugreek Leaves Veggie by Shraddha Juwatkar at BetterButter
1016
2
0.0(0)
0

बारीक मेथीची भाजी

Dec-08-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बारीक मेथीची भाजी कृती बद्दल

पालेभाज्या ह्या सगळ्याच खाण्यासाठी पौष्टिक असतात.अशीच एक चविष्ट भाजी बारीक मेथी हि वाळूत उगवली जाते व हिवाळ्यात ही भाजी बाजारात दिसते. ह्या भाजीला एक वेगळीच चव असते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • बेसिक रेसिपी
  • डायबेटिक

साहित्य सर्विंग: 6

  1. 10 जुड्या बारीक मेथी
  2. 2 मोठे कांदे
  3. 4/5 हिरव्या मिरच्या
  4. 4/5 लसूण पाकळ्या
  5. 1 टीस्पून जिरे
  6. चिमूटभर हिंग
  7. चवीनुसार मीठ
  8. 1 वाटी ओले खोबरे
  9. 2 टेबलस्पून तेल

सूचना

  1. भाजीच्या जुड्या मागील बाजूने वाळू असेल तिथून कापून घ्यावात
  2. भाजी धुताना धावत्या पाण्याखाली स्वछ धुवावी. ही भाजी 4/5 वेळा पाण्यातून काढावी. सर्व माती निघून जाते. शेवटी एका चाळणीत घेऊन धुवावी व दहा मिनिटे चाळणीत ठेवून दयावी जेणेकरून जास्तीचे पाणी निघून जाईल.
  3. नंतर भाजी कापून घ्यावी तसेच कांदे व मिरच्या ही बारीक चिरून घ्यावे. लसूण सुध्दा बारीक चिरावा.ओले खोबरे किसून घ्यावे.
  4. कढईत तेल गरम करत ठेवावे व त्यात लसूण, मिरच्या, जिरे व हिंग घालून फोडणी करावी.
  5. कांदे घालून तपकिरी रंगावर परतून घ्यावे
  6. कांदे चांगले परतून झाल्यावर मेथी घालून नीट हलवून घ्यावे.भाजीला पाणी सुटते ते आटे पर्यंत भाजी परतावी. नंतर मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ काढावी.
  7. वाफ काढून झाल्यावर खोबरे घालून एकदा व्यवस्थित ढवळून गॅस बंद करावा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर