मुख्यपृष्ठ / पाककृती / आरोग्यदायी पाया सूप

Photo of Healthy Paya Soup by Shraddha Juwatkar at BetterButter
110
3
0.0(0)
0

आरोग्यदायी पाया सूप

Dec-09-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

आरोग्यदायी पाया सूप कृती बद्दल

मटणातील हड्डींच्या तुकड्यांत उच्च दर्जाचे मिनरल्स, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम,सोडीयम घटक आढळतात. हिवाळ्यात सर्दी खोकला, सांधेदुखी चा बहुतेक जणांना त्रास होतो तेव्हा हे सूप घरच्या घरी नक्की बनवून बघा.

रेसपी टैग

 • नॉन व्हेज
 • सूप
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. 4 बोकडाचे पाया
 2. हिरवी पेस्ट: 5 हिरव्या मिरच्या, 10 लसूण पाकळ्या, 1 इंच आले व थोडी कोथिंबीर
 3. 3 हिरवी वेलची
 4. 1 दालचिनीचा टुकडा
 5. 4 लवंगा
 6. 4 काळीमिरी
 7. 2 तमालपत्र
 8. 2 टेबलस्पून तेल किंवा तूप
 9. चवीनुसार मीठ
 10. चिमूटभर काळीमिरी पूड व बारीक चिरलेली कोथींबीर

सूचना

 1. पाया मटणवाल्या कडून साफ करून आणायचे. ते व्यवस्थित त्याचे केस व सालं काढून देतात. घरी आणलं की पाया स्वछ पाण्यात चांगले धूवून घेणे.
 2. पायाला हळद व हिरवी पेस्ट लावून एक तास मॅरिनेट करून ठेवावे.
 3. एक तासानंतर गॅस वर कुकर ठेवून तेल किंवा तूप गरम करावे व त्यात तमालपत्र, हिरवी वेलची, दालचिनी, लवंगा व काळीमिरी घालून छान फोडणी करावी.
 4. फोडणी चांगली तडतडली की पाया घालून चांगले त्याचा कच्चा वास जाये पर्यंत परतून घ्यावे.
 5. पाया चांगले परतले गेले की 2 ग्लास पाणी ओतून उकळी काढणे. जास्त पाणी घालू नये नाहीतर कुकर मधून बाहेर येण्याची शक्यता असते.
 6. उकळी चांगली आल्यावर त्यात चवीनुसार मीठ घालून झाकण लावून मध्यम आचेवर 10/12 शिट्या काढून घेणे कारण पाया शिजायला बराच वेळ लागतो.
 7. कुकर थंड झाल्यावर उघडून हवे असल्यास थोडे गरम पाणी घालून हवे तितके पातळ करावे. वरून काळीमिरी पूड व कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर