मुख्यपृष्ठ / पाककृती / पालक मटारच्या शंकरपाळ्या

Photo of Spinach-Peas Shankarpali by Amruta Jadhav at BetterButter
933
4
0.0(0)
0

पालक मटारच्या शंकरपाळ्या

Dec-09-2018
Amruta Jadhav
10 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पालक मटारच्या शंकरपाळ्या कृती बद्दल

वाटाणा आणि पालक हे थंडीत मुबलक प्रमाणात उपलब्ध होतात. वाटाण्यामध्ये लोह तर पालकामध्ये लोह, कँल्शिअम 'अ' 'ब' 'क' जीवनसत्व भरपूर प्रमाणात असत. म्हणून या दोन गोष्टींचा वापर करून आणि लहानांपासून वृद्धापर्यंत सगळंयाना आवडणा्या शंकरपाळ्याची पाककृती बेटर बटर वरील स्पर्धसाठी.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धी वाटी ओला कोवळा सोललेला वाटाणा
  2. अर्धी वाटी चिरलेला पालक
  3. मोठी वाटी मैदा
  4. अर्धी वाटी कणीक
  5. अर्धी वाटी बेसन पीठ
  6. एक चमचा बारीक केलंल जीरे आणि ओवा
  7. दोन लहान चमचे लाल तिखट
  8. तीन चमचे तूप
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल तळण्यासाठी
  11. पाणी गरजेनुसार

सूचना

  1. वाटाणा व पालक मिक्सरच्या भाड्यांत घेऊन त्यांची बारीक पेस्ट करा.
  2. नंतर ती पेस्ट मोठ्या बाऊलमध्ये काढा, त्यांत मैदा, कणीक, बेसन पीठ, ओवा-जिरे पूड, लाल तिखट, मीठ घाला.
  3. तूप गरम करून घाला. नंतर सगळे चांगले एकञ करून घ्या, गरजेनुसार पाणी घालून मऊसर एकजीव मळून घ्या.
  4. हा भिजवलेला गोळा अर्धा तास झाकून ठेऊन द्या. नंतर एका कढईत तेल गरम करायला ठेवा.
  5. तयार गोळ्याच्या मध्यम जाडीच्या पोळ्या लाटून त्यांचे शंकरपाळी सारखे काप करा, व गरम तेलात लालसर रंग येईपर्यंत तळून घ्या.
  6. छान खुशखुशीत अश्या शंकरपाळ्या तयार आहेत. चहा किंवा टॉमोटो सॉस सोबत सर्व्ह करा.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर