मुख्यपृष्ठ / पाककृती / बिना अंड्याचा कुकरमध्ये मार्बल केक

Photo of Eggless cooker marbal cake by Rohini Malwade at BetterButter
34
4
0.0(0)
0

बिना अंड्याचा कुकरमध्ये मार्बल केक

Dec-10-2018
Rohini Malwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
50 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

बिना अंड्याचा कुकरमध्ये मार्बल केक कृती बद्दल

कुकर मध्ये बिनाअंड्याचा केक

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • किड्स रेसिपीज
 • इंडियन
 • प्रेशर कूक
 • बेकिंग
 • डेजर्ट
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

 1. 2 कप मैदा
 2. दीड कप पिठी साखर
 3. अर्धा कप तेल किंवा बटर किंवा तूप
 4. 2 चमचे कोकोपावडर
 5. दिड कप दूध
 6. 1 टेबलस्पून बेकिंग सोडा

सूचना

 1. 1- सगळ्यात पाहिले केक च्या भांडयाला तूप लावून खाली बटर पेपर टाकावा.
 2. 2- नंतर कुकर मध्ये 1 वाटी बारीक मीठ टाकून कुकर प्रिहीट करावे.
 3. 3- आता एका भांड्यात दूध, पिठीसाखर,आणि तेल टाकून चांगले मिक्स करावे.
 4. 4- दुसरी कडे मैदा आणि सोडा एकत्र करून 2 वेळा चाळून घ्यावा.
 5. 5-आता दुधाच्या मिश्रनात मैदा टाकून मिक्स करावे
 6. 6- चांगले मिक्स झाल्यावर 2 भांड्यात अर्धे अर्धे मिश्रण वेगवेगळे करावे.
 7. 7- आता एका मिश्रणात कोकोपावडर टाकून मिक्स करावे घट्ट वाटत असेल तर थोडे दूध घालून मिश्रण व्यवस्थित भिजवून घ्यावे.
 8. 8- आता केक च्या भांड्यात एक चमचा कोकोपावडर घातलेले आणि एक चमचा साधे मिश्रण टाकून छान लेअर्स करून घ्यावेत.
 9. 9- आता कुकर मध्ये हे भांडे ठेवावे आणि कमी गॅस वर 30 मिनिट बेक करावे.
 10. 10- 30मिनिटानंतर टूथपिक घालून बघावे क्लीन निघाली की केक तयार झाला गॅस बंद करून पूर्ण थंड झाल्यावर केक डीमोल्ट करावा.
 11. 11- केक तयार आहे .

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर