मुख्यपृष्ठ / पाककृती / मेथी बाजरीचे वडे

Photo of Methi vade by seema Nadkarni at BetterButter
1193
1
0.0(0)
0

मेथी बाजरीचे वडे

Dec-10-2018
seema Nadkarni
60 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मेथी बाजरीचे वडे कृती बद्दल

थंडी मध्ये हिरव्या पालेभाज्या भरपूर मिळतात, बाजरी खुप गरम असल्याने थंडीत खायला बरे असते. मेथी व बाजरीचे मिश्रण करून तयार केलेले वडे खूप छान लागते..

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हाय फायबर

साहित्य सर्विंग: 5

  1. 1 जूडी मेथी
  2. 2 कप बाजरी चे पीठ
  3. 1/2 कप दही
  4. 2 चमचा आले लसुण पेस्ट
  5. 2-3 हिरव्या मिरच्या
  6. चवी पुरते मीठ
  7. 1/4 टि स्पून हळद
  8. 1 चमचा लाल तिखट
  9. बारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 1 चमचा साखर
  11. 1 चमचा तीळ

सूचना

  1. मेथीची जुडी साफ करून स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यावे.
  2. थोडे पाणी घालून उकळून घ्या. थंड करून घ्यावे.
  3. एका बाउल मध्ये मेथी चे मिश्रण , त्यात दही, आले लसुण पेस्ट, बारीक चिरलेली हिरवी मिरची, साखर,लाल तिखट, हळद, तीळ, थोडा सोडा, मीठ व सगळे मसाले एकत्रित करावे.
  4. या मिश्रणात मावेल तितके बाजरीचे पीठ घालून कणीक भिजवून घ्या.
  5. पोलपाट वर ओला रूमाल ठेवून छोटे छोटे गोळे थापून त्यात एक बोटानी होल करून घ्यावे.
  6. तेल तापवून त्यात तळून घ्यावे.
  7. गरम गरम दही बरोबर किंवा चटणी बरोबर खाल्ले की छान लागते.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर