मुख्यपृष्ठ / पाककृती / खजूर खोबर्याचे लाडू

Photo of Date's Coconut Ladoo by Amruta Jadhav at BetterButter
667
4
0.0(0)
0

खजूर खोबर्याचे लाडू

Dec-11-2018
Amruta Jadhav
15 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खजूर खोबर्याचे लाडू कृती बद्दल

खजूर उष्ण असल्याने थंडी मध्ये खजूर लाडू खाण्यास उपयुक्त आहेत.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • सौटेइंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. सीडलेस खजूर दोन वाटी
  2. सुके खोबरे बारीक किसलेले 1 मोठी वाटी
  3. तूप 1 वाटी
  4. काजू काप 2 चमचे
  5. बदाम काप 2 चमचे
  6. पीठी साखर अर्धी वाटी
  7. खसखस 2 चमचे

सूचना

  1. खसखस भाजून मिक्सरला बारीक करून घ्या.
  2. सुके खोबरे बारीक आचेवर 2 मिनिटे भाजून घ्या.
  3. नंतर सीडलेस खजूर मिक्सरला बारीक करून घ्या.
  4. एका कढईत तूप गरम करा, त्यात बारीक केलेली खजूर बारीक आचेवर 5 मिनीटे परतून घ्या.
  5. या मिश्रणात सुके खोबरे, खसखस, काजू बदाम काप घालून 2 मिनिटे परतून घ्या. व गँस बंद करा.
  6. हे गरम मिश्रण ताटात घेऊन त्यात पीठी साखर घालून नीट मिक्स करून लाडू वळून घ्या.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर