मुख्यपृष्ठ / पाककृती / गरम मसाल्याची आमटी

Photo of GARAM MASALA AMATI by आदिती भावे at BetterButter
82
1
0.0(0)
0

गरम मसाल्याची आमटी

Dec-12-2018
आदिती भावे
20 मिनिटे
तयारीची वेळ
25 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गरम मसाल्याची आमटी कृती बद्दल

थंडी पडली की गरम गरम खावेसे वाटते. जेवणात जर अशी गरमागरम आमटी आणि भात असेल तर एकपर्वणीच. आणि यात सर्दी घालवणारे पदार्थ असल्याने . आरोग्यासाठी पण छान.

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • इतर
 • महाराष्ट्र
 • बॉइलिंग
 • स्टीमिंग
 • अकंपनीमेंट
 • एग फ्री

साहित्य सर्विंग: 6

 1. तुरीची डाळ - 1 वाटी
 2. कांदे -2
 3. सुके खोबरे अखंड- अर्धी वाटी
 4. तेल - फोडणी साठी
 5. मोहरी-1 चमचा
 6. हळद - 1 चमचा
 7. तिखट- गरजेनुसार
 8. मीठ - चवीनुसार
 9. आमसुलं- 3 ते 4
 10. गरम मसला साठी-
 11. दालचिनी - 1 छोटा तुकडा
 12. लवंगा - 7,8
 13. मिरी - 10 ते 12
 14. बडीशेप- 2 मोठे चमचे
 15. खसखस- 1 चमचा
 16. लसूण - 6,7 पाकळ्या
 17. आलं - 2 इंच

सूचना

 1. तुरीची डाळ शिजवून घ्यावी.
 2. कांदे व खोबरे गॅसवर भाजून घ्यावे.
 3. गरम मसाला सगळा भाजून घ्यावा.
 4. कांदे , खोबरे , व गरम मसाला गार झाल्यावर मिक्सर मधून बारीक वाटून घ्यावे.
 5. वाटतानाच त्यात आलं लसूण पण घालावे व एकत्र वाटावे.
 6. तेल गरम करून घ्यावे.
 7. त्यात फोडणी करून घ्यावी.
 8. हा वाटलेला मसाला घालून परतावे.
 9. तिखट घालून परतावे.
 10. आता तुरीची डाळ घोटून घेऊन यात घालावी.
 11. मीठ, आमसुलं घालावे.
 12. उकळी काढावी.
 13. गरम भाताबरोबर खावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर