BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / Pani Puri

Photo of Pani Puri by BetterButter Editorial at BetterButter
84
302
0(0)
1

पाणी पुरी

Aug-28-2015
BetterButter Editorial
0 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पाणी पुरी कृती बद्दल

गोलगप्पा, फुलकी व फुचका अशा नावाने प्रसिद्ध असणारा पाणी पुरी हा रस्त्यावर मिळणारा चविष्ट भराव आणि गोड/आंबट पाण्याचा अदभूत असा खाद्यपदार्थ आहे.

रेसपी टैग

 • युपी
 • ब्लेंडींग
 • स्नॅक्स

साहित्य सर्विंग: 4

 1. भरावासाठी घटक :
 2. 3 मध्यम आकाराचे बटाटे
 3. 1 मध्यम आकाराचा कांदा
 4. 1/2 टी स्पून चाट मसाला पावडर
 5. 1/2 टी स्पून जीरे पावडर ( भाजलेली )
 6. 1/4 टी स्पून लाल मिरची पावडर
 7. बारीक चिरलेली मुठभर कोथिंबीर
 8. जरूरीप्रमाणे काळे मीठ
 9. पाण्यासाठी घटक :
 10. 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची
 11. बारीक चिरलेले 1 इंच आल्ले
 12. 1 व 1/2 टी स्पून चाट मसाला पावडर
 13. 1 व 1/2 टी स्पून जीरे पावडर ( भाजलेली )
 14. 1 टेबल स्पून चिंचेची पेस्ट
 15. 3 टेबल स्पून गुळ ( कुस्करलेला किंवा पावडर )
 16. 1/2 कप चिरलेली कोथिंबीर
 17. 1/2 कप बारीक चिरलेला पुदिना
 18. 2 टेबल स्पून तळलेली बुंदी
 19. 2 ते 3 कप पाणी
 20. जरूरीप्रमाणे काळे मीठ
 21. पुरीसाठी घटक :
 22. 200 ग्रॅम गव्हाचा कोंडा ( रवा / सूजी )
 23. 1/4 टी स्पून बेकिंग सोडा
 24. 45 ग्रॅम आटा ( मैदा )
 25. चवीनुसार मीठ
 26. तळण्यासाठी तेल

सूचना

 1. पुरीसाठी :
 2. एक बाऊल घेऊन त्यामध्ये गव्हाचा कोंडा, आटा, बेकिंग सोडा व मीठ घालावे. कणिक बनविण्यासाठी त्यामध्ये थोडे गरम पाणी घालावे.
 3. ओलसर मलमलच्या कापडात बांधून 30 मिनिटे बाजूला ठेवावे.
 4. कणकेचे छोट्या आकाराचे लिंबाएवढे गोल गोळे करावेत .
 5. थोडे पीठ पसरलेल्या पोळपाटावर पातळ रोटी लाटून घेणे आणि त्याच्यावर कुकी कटरने / डब्याच्या झाकणाने गोल आकाराचे तुकडे करावेत.
 6. जड तळाचा पॅन / कढई घ्यावी आणि त्यामध्ये तळण्यासाठी पुरेसे तेल गरम करावे.
 7. तेल गरम झाल्यावर एकावेळी 3-4 पुरी घालून त्या व्यवस्थित तळाव्यात.
 8. पुरी तळताना त्याच्या मधोमध दाबावे म्हणजे त्यात हवा भरली जाईल.
 9. पुरी पलटावी आणि ती कुरकुरीत व सौम्य तांबूस रंग येईपर्यंत तळावी.
 10. जास्तीचे तेल निघून जाण्यासाठी पुरी कागदी टाॅवेलवर ठेवावी .
 11. खाण्यापूर्वी पुरी चांगली थंड होऊ द्यावी . त्या तुम्ही हवाबंद डब्यात ठेवून गरजेप्रमाणे कधीही वापरू शकता.
 12. भरावासाठी :
 13. बटाटे धुवून घ्यावे आणि व्यवस्थित शिजेपर्यंत उकळावेत.
 14. बटाटे शिजल्यावर त्याची साले काढावीत आणि त्याचे छोटे चौकोनी तुकडे करावेत. तसेच कांदा देखील बारीक चिरून घ्यावा .
 15. एक छोटे बाऊल घेऊन त्यामध्ये कांदा, बटाटे, कोथिंबीर, चाट मसाला पावडर, जीरे पावडर आणि काळे मीठ घालावे.
 16. हे मिश्रण हलवून चांगल्या प्रकारे मिसळून घ्यावे आणि बाजूला ठेवावे.
 17. पाणी बनविण्यासाठी :
 18. पाण्याचे सर्व घटक घेऊन त्यात थोडे पाणी घालून दळून चटणीसारखे बनवावे.
 19. हे सगळे बारीक दळल्यावर एका मोठ्या बाऊलमध्ये पाण्याचे मिश्रण टाकावे . 2-3 कप पाणी टाकून चांगले मिसळून घ्यावे.
 20. मिश्रणाची चव घेऊन पहावी , तुम्ही आपल्या आवडीनुसार त्यामध्ये आणखी थोडे मीठ किंवा मसाले टाकू शकता .
 21. शेवटी या पाणी मिश्रणात बुंदी घालावी .
 22. खायला देण्यापूर्वी हे मिश्रण फ्रीजमध्ये ठेवावे किंवा त्यामध्ये बर्फाचे तुकडे टाकावेत.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर