मुख्यपृष्ठ / पाककृती / तुरीच्या दाण्याचा पुलाव

Photo of TURICHYA Danyacha pulao by Rohini Malwade at BetterButter
720
1
0.0(0)
0

तुरीच्या दाण्याचा पुलाव

Dec-13-2018
Rohini Malwade
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

तुरीच्या दाण्याचा पुलाव कृती बद्दल

हा पुलाव खूप टेस्टी आहे आणि हिवाळ्यात तुरीचे दाणे मिळतात तेव्हा आवर्जून करावा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. एक वाटी तांदूळ
  2. अर्धी वाटी ओल्या तुरीचे दाणे
  3. खडे मसाले(दालचिनी, लवंग, मिरे,तमालपत्र, वेलची)
  4. तिखट
  5. मीठ
  6. हळद
  7. गरम मसाला
  8. कांदा अर्धी वाटी
  9. टोमॅटो 1
  10. बटाटा 1
  11. वांग 1
  12. जिरे मोहरी
  13. आलं लसूण पेस्ट
  14. कडीपत्ता

सूचना

  1. कुकरमध्ये तेल घालून त्यात जिरे मोहरी आणि खडेमसाले घालून परतावे.
  2. नंतर त्यात आलं लसूण पेस्ट कांदा कडीपत्ता घालावा व छान परतून घ्यावे.
  3. नंतर बटाटा,वांग,तुरीचे दाणे,टोमॅटो सर्व बारीक चिरून घालावे व 2 मिनिटे परतून घ्यावे.
  4. नंतर त्यात हळद, लालतिखट, मीठ व गरम मसाला घालावा.
  5. आता त्यात तांदूळ धुवून घ्यावे व ते पण घालून 3 ते 4 मिनिट परतून घ्यावे.
  6. नंतर 2 वाटी पाणी घालून मिक्स करावे थोडी कोथिंबीर घालून मिक्स करावे व झाकण लावून 2 शिट्टी करून घ्यावे.
  7. कुकर ची वाफ गेली की पुलाव तयार आहे.पापड,लोणचे किंवा दहयाबरोबर सर्व्ह करावी.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर