BetterButter अॅप

पाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर

(8,719)
डाउनलोड करा

कृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा

मुख्यपृष्ठ / पाककृती / गव्हाचे सत्व

Photo of gahu satva by supriya padave (krupa rane) at BetterButter
0
3
0(0)
0

गव्हाचे सत्व

Dec-13-2018
supriya padave (krupa rane)
1448 मिनिटे
तयारीची वेळ
10 मिनिटे
कूक वेळ
2 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

गव्हाचे सत्व कृती बद्दल

ठंडी मधे शरीराला ऊर्जा मिळणे खुप जरुरी असते ,गहु सत्वा मुळे थोड्या फार प्रमाणात आपण ते पूर्ण करू शकतो.हे सत्व लहानां पासून मोठ्या साठी सुद्धा पौष्टिक आहे.ठंडी मधे हे गरम गरम खाले की पोट सुद्धा भरते .खुप साधी सोपी रेसिपी आहे.

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • बॉइलिंग
  • ब्रेकफास्ट आणि ब्रन्च
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 2

  1. एक वाटी गहु
  2. अर्धा वाटी साखर
  3. वेलचि पूड
  4. तिन चमचे तूप
  5. दोन वाटी दूध
  6. बदाम व् चारोळी

सूचना

  1. प्रथम गहु स्वछ धुवून पाण्यात भिजत ठेवा .गहु किमान 24 तास तरी भिजले पाहिजेत . त्यामुळे गहु छान फुगतिल व् नरम होतील
  2. आता सर्व साहित्य जमा करा ,गहु पाण्यातून निथलुन बाहेर काढ़ा
  3. आता गहु मधे दोन छोटे ग्लास पानी टाकून मिक्सर मधून बारीक वाटून घ्या
  4. आता हे मिश्रण चाळनी वर ठेवून गाळून घ्या ज्यामुळे आपल्याला गव्हा चा चिक मिळेल व् चोथा सर्व गाळनि वर जमा होईल
  5. सर्व चोथा ह्या प्रकारे जमा होईल
  6. आता गहु च्या चीका मधे दूध मिक्स करुन एकजीव करुन घ्या
  7. आता टोपात तूप तापत ठेवा
  8. हयात गहु चिक व् दुधा चे मिश्रण ओता
  9. हे मिश्रण सतत ढ़वळत रहा , दोन मिनट नंतर हयात साखर ,वेलच्चि पूड व् ड्राई फ्रूट टाका,मिश्रण हळूहळु घट्ट होत जाईल
  10. सतत ढवळत रहा मग गुठल्या होणार नाहीत सात ते आठ मिनिटांत गहु सत्व तैयार
  11. गरज वाटल्यास तुम्ही दुधाचे प्रमाण वाढवून घट्ट पातळ करू शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर