मुख्यपृष्ठ / पाककृती / खेकड्याच कालवण

Photo of CRAB curry by kanchan date at BetterButter
978
1
0.0(0)
0

खेकड्याच कालवण

Dec-13-2018
kanchan date
30 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

खेकड्याच कालवण कृती बद्दल

खेकडे हे गरम असतात त्यामुळे ते थंडीत खाल्लेले चांगले तसेच ज्यांना कंबर दुखीचा त्रास आहे त्यांनीही खेकडे जरूर खावेत.

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • मध्यम
  • महाराष्ट्र
  • अॅपिटायजर
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 6 काळ्या पाठीचे खेकडे
  2. 4 मोठे कांदे
  3. 1 वाटी सुकं खोबर
  4. 7-8 लसूण पाकळ्या
  5. एक इंच आलं
  6. मूठभर कोथिंबीर
  7. 1 चमचा धने
  8. 3-4 चमचे तेल
  9. 2 चमचे ठेवणीतले मसाला किंवा मालवणी मसाला
  10. 1 चमचा लाल तिखट
  11. अर्धा चमचा हळद
  12. मीठ चवीनुसार

सूचना

  1. खेकड्याचे नांगे / पाय तोडून ते स्वच्छ 3-4वेळा धुवून घ्यावे
  2. खेकड्याची पाठ उकलून घ्यावी
  3. खोबर्याचे काप करून भाजून घ्यावे
  4. कांदे उभे चिरून अर्धा चमचा तेल घालून भाजून घ्यावे
  5. कांदे भाजताना त्यातच लसूण आणि आलं घालावे व भाजून घ्यावे
  6. धने भाजून घ्यावे
  7. आता हे थंड करावे व नंतर कांदा खोबर धने कोथिंबीर घालून वाटण करून घावे
  8. खेकड्याचे छोटे नांगे / पाय आहेत ते सुद्धा पाणी घालून बारीक वाटून घ्यावे. आणि गाळणीने गाळून त्याचे पाणी काढावे व चोथा फेकून द्यावा
  9. टोपात तेल गरम करून त्यात वाटण घालून छान परतून घ्यावे
  10. तेल सुटू लागले कि त्यात लाल तिखट मालवणी मसाला हळद घालून थोडं परतून घ्यावे
  11. आता त्यात खेकडे आणि मोठे नांगे टाकून परतावे
  12. आवश्यकतेनुसार पाणी आणि मीठ घालावे
  13. छोटे नांग्याच जे पाणी होत ते घालावं आणि छान उकळी येऊ द्यावी
  14. 10-15 मिनिटात खेकडे छान शिजतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर