मुख्यपृष्ठ / पाककृती / कोळंबी बिर्याणी

Photo of Kolambi Biryani by Manisha Lande at BetterButter
1723
1
0.0(0)
0

कोळंबी बिर्याणी

Dec-14-2018
Manisha Lande
5 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोळंबी बिर्याणी कृती बद्दल

चविष्ट आणिक चमचमीत

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • सोपी
  • महाराष्ट्र
  • प्रेशर कूक
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. अर्धा किलो कोळंबी
  2. २ वाटी बिर्याणी तांदूळ
  3. ४ मोठे कांदे उभे चिरून
  4. १/२ वाटी खोवलेलं ओलं खोबरं
  5. १ वाटी नारळाचं दूध
  6. १/४ वाटी मटारचे दाणे
  7. १/४ वाटी तुरीचे दाणे
  8. मुठभर अख्खे काजू
  9. १ मोठा चमचा आलं-लसुण पेस्ट
  10. १/४ छोटा चमचा जिरं
  11. १ मोठा चमचा लाल तिखट
  12. १/२ छोटा चमचा हळद
  13. १/२ लिंबू रस
  14. चवीनुसार मीठ
  15. तेल
  16. गरम पाणी आवश्यकतेनुसार
  17. १/२ लिंबाची फोड
  18. कांदाच्या चकत्या

सूचना

  1. प्रथम कोळंबी व्यवस्थित साफ करून त्याला हळद, मीठ, लाल तिखट व आलं-लसुण पेस्ट लावून अर्धा तास मॅरिनेट करुन ठेवले.
  2. तांदूळ धुवून १५ मिनिटे निथळत ठेवले.
  3. कुकरमध्ये २ मोठे चमचे तेल गरम करून त्यात जिरं घालून ते छान तडतडल्यावर त्यात चिरलेले कांदे घालून ते सोनेरी रंगावर छान भाजून घेतले.
  4. नंतर त्यात मॅरिनेट केलेली कोळंबी, मटारचे दाणे, तुरीचे दाणे व काजू घालुन त्यावर झाकण ठेवून एक वाफ आणली.
  5. नंतर त्यात निथळत ठेवलेले तांदूळ घालुन थोडे परतून त्यात लाल तिखट, नारळाचं दूध, चवीनुसार मीठ, लिंबू रस व आवश्यकतेनुसार गरम पाणी घालुन कुकरचे झाकण बंद करून गॅसवर ठेवून मोठया आचेवर ३ शिट्टया काढून बिर्याणी शिजवून घेतली.
  6. तयार बिर्याणी सर्व्हींग डिशमध्ये वाढून त्याच्या सर्व बाजूंनी खोवलेलं ओलं खोबरं घालून, लिंबूची फोड व कांदाच्या चकत्या ठेवून गरमागरम सर्व्ह केला.
  7. "कोळंबी बिर्याणी" खायला तयार.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर