मुख्यपृष्ठ / पाककृती / थंडीतच बनणारा उंधियो

Photo of Winter special Undhiyo by archana chaudhari at BetterButter
726
2
0.0(0)
0

थंडीतच बनणारा उंधियो

Dec-15-2018
archana chaudhari
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
8 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

थंडीतच बनणारा उंधियो कृती बद्दल

उंधियो हा एक थंडीतील पदार्थामध्ये खाल्ला जाणारा उत्तम पौष्टीक पदार्थ आहे.मी ज्या प्रकारे बनविला आहे तसा तुम्ही नक्की बनवून बघा.

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • गुजरात
  • प्रेशर कूक
  • फ्रायिंग
  • सौटेइंग
  • मेन डिश
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 8

  1. भाज्या
  2. पापडी दाणे १/२ कप
  3. तुरीचे दाणे १/२ कप
  4. मटार १ कप
  5. फ्लॉवर १ कप मोठे तुकडे चिरून
  6. बटाटा १मोठे तुकडे चिरून
  7. सुरण १/४ कप मोठे तुकडे चिरून
  8. कच्चे केळे १ मोठे तुकडे चिरून
  9. लहान काटेरी वांगी ५
  10. मुठीयासाठी
  11. बेसन ३ कप
  12. गहू पीठ १/२ कप
  13. धणे पावडर १टीस्पून
  14. तिखट २टीस्पून
  15. आले,लसूण,मिरची पेस्ट १ टीस्पून
  16. हळद १/२ टीस्पून
  17. गरम मसाला १ टीस्पून
  18. साखर १/२ टेबलस्पून
  19. तीळ २ टीस्पून
  20. लिंबूरस १टेबलस्पून
  21. तेल १टेबलस्पून गरम करून
  22. मेथीची ताजी पाने ४ कप
  23. इनो फ्रुट सॉल्ट १ चिमूटभर
  24. फोडणीसाठी
  25. तेजपान २
  26. सुकी लाल मिरची २
  27. तीळ १ टेबलस्पून
  28. आलं,लसूण,मिरची पेस्ट १ टीस्पून
  29. तेल २ कप
  30. वरून टाकण्यासाठी
  31. साखर १/२ चमचा
  32. लिंबू रस १ टीस्पून
  33. मीठ चवीनुसार

सूचना

  1. एका भांड्यात बेसन पीठ, गहू पीठ,धणे पावडर, तिखट,हळद, गरम मसाला, आले,लसूण,मिरची पेस्ट,साखर,तीळ,,लिंबू रस,तेल,मेथीची पाने,मीठछान एकत्र करून घ्या.
  2. वरील मिश्रणाचे ३ भाग करून घ्या आणि १भाग बाजूला ठेवा.
  3. वरील मिश्रणाचा २ भाग आणि इनो फ्रुट सॉल्ट घेऊन थोडेसे पाणी टाकून गोळा भिजून घ्या.
  4. लहान लहान मुठीया बनवून घ्या.
  5. कढईत तेल गरम करून घ्या,आणि वरील मुठीये त्यात तळून घ्या.
  6. वरील तेलातच बटाटा,सुरण,फ्लावर,केळे तळून घ्या.
  7. तळून झाल्यावर त्यावर थोडेसे बाजूला ठेवलेले मिश्रण भुरभुरावे.
  8. वांग्यांना मधून काप देऊन त्यात वरील मिश्रण गच्च दाबून भरावे.
  9. मटार,तुरीचे दाणे,पापडीचे दाणे तयार ठेवा.
  10. कुकरमध्ये तळलेल्या भाज्या,वांगी,वरील सगळे दाणे,तळलेले मुठीया टाकून २शिट्या करून घ्या.
  11. आता राहिलेल्या तेलातच फोडणीत तेजपाल,लाल मिरची,तीळ,आले,लसूण ,पेस्ट घाला.
  12. टोमॅटो प्युरी घालून छान परतवून घ्या.
  13. कुकरमधील भाज्या घालून हळूवार हलवून घ्या. मीठ घाला.
  14. मध्यम आचेवर १५ मिनिटे झाकून ठेवा.
  15. शेवटी साखर आणि लिंबू घाला.
  16. उंधियो तयार आहे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर