एग पफ | Egg Puff Recipe in Marathi

प्रेषक kanchan date  |  16th Dec 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Egg Puff by kanchan date at BetterButter
एग पफby kanchan date
 • तयारी साठी वेळ

  5

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  20

  मि.
 • किती जणांसाठी

  4

  माणसांसाठी

3

0

एग पफ recipe

एग पफ बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Egg Puff Recipe in Marathi )

 • तेल आवश्यकतेनुसार
 • 2 चमचे टोमॅटो केचप
 • मीठ चवीनुसार
 • अर्धा चमचा बेकिंग सोडा
 • 1 चमचा मिक्स herbs
 • 2 कप मैदा
 • अर्धा चमचा हळद
 • 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून
 • 1 कांदा बारीक चिरून
 • 3 अंडी

एग पफ | How to make Egg Puff Recipe in Marathi

 1. मैद्यामध्ये मीठ, मिक्स हेरबस आणि 2 चमचे तेल घालून मिक्स करा
 2. थोडं थोडं पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्या
 3. 10 मिनिटे पीठ झाकून ठेवा
 4. एका पॅन मध्ये 2 चमचे तेल घालून त्यावर कांदा घाला व छान गुलाबी करून घ्या
 5. आता त्यात मिरची आणि हळद घालून परतवून घ्या
 6. त्यात अंडी फोडून घाला व मिक्स करा
 7. मिश्रण कोरडे करून घ्या व त्यात टोमॅटो केचप घालून मिक्स करा
 8. गॅस बंद करून मिश्रण थंड करून घ्या
 9. आता पिठाची छापता लाटून घ्या आणि त्याचे छोटे आयटकरुती 6 भाग करून घ्या
 10. एका तुकड्यावर थोडं मिश्रण भरून त्यावर दुसरा पिठाचा तुकडा ठेवा
 11. चारही बाजूने नीट दाबून घ्या आता काट्याच्या चमच्याने कडा हलक्या हाताने प्रेस करून घ्या म्हणजे छान डेसिग्न येईल आणि मिश्रण पण बाहेर येणार नाही
 12. तेल गरम करून त्यात हे पफ दीप फ्राय करा
 13. गरम गरम साँस सोबत सर्व्ह करा

My Tip:

पीठ घट्ट मळावे म्हणजे पफ नरम पडणार नाही

Reviews for Egg Puff Recipe in Marathi (0)