मुख्यपृष्ठ / पाककृती / कोळंबी मसाला

Photo of Prawns Masala by kanchan date at BetterButter
823
2
0.0(0)
0

कोळंबी मसाला

Dec-16-2018
kanchan date
20 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

कोळंबी मसाला कृती बद्दल

हिवाळ्यात नॉन वेग भरपूर खावे आणि कोळंबी हि उष्ण असते म्हणून हिवाळ्यात खावे

रेसपी टैग

  • नॉन व्हेज
  • महाराष्ट्र
  • मेन डिश

साहित्य सर्विंग: 4

  1. 1 किलो सोलेली कोळंबी
  2. 3 मोठे कांदे बारीक कापून
  3. 2 टोमॅटो बारीक कापून
  4. 1 शिमला मिरची बारीक कापून
  5. 2 चमचे आलं लसूण पेस्ट
  6. 2 चमचे लाल तिखट
  7. 2 चमचे धना पावडर
  8. 1 चमचा गरम मसाला
  9. अर्धा चमचा हळद
  10. 1 लिम्बु
  11. मीठ चवीनुसार
  12. कोथिंबीर बारीक चिरलेली
  13. थोडी पुदिन्याची पाने
  14. 4 चमचे तेल

सूचना

  1. कोळंबी स्वतःच धुवून घ्यावी
  2. त्यात हळद आणि लिंबाचा रस घालून 15 मिनिटे marinate करायला ठेवावे
  3. एका कढईत तेल घालून त्यात कांदा घालावा व छान गुलाबी रंग येई पर्यंत परतवून घावे
  4. आता त्यात आलं लसूण पेस्ट घालून परतावे
  5. टमाटे घालून छान मऊ होई पर्यंत परतावे
  6. आता त्यात सुके मसाले घालून परतावे
  7. शिमला मिरची, कोळंबी आणि मीठ घालावे
  8. 5 मिनिटे झाकण ठेऊन शिजवून घ्यावी
  9. 5 मिनिटाने त्यात कोथिंबीर आणि पुदिना घालावा
  10. पाणी सुके पर्यंत परतून घ्यावे
  11. गरम भाकरीसोबत सर्व्ह करावे

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर