मुख्यपृष्ठ / पाककृती / भरेला मरचा

Photo of Stuffed Chilli Fry by Shraddha Juwatkar at BetterButter
22
3
0.0(0)
0

भरेला मरचा

Dec-16-2018
Shraddha Juwatkar
0 मिनिटे
तयारीची वेळ
30 मिनिटे
कूक वेळ
6 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

भरेला मरचा कृती बद्दल

हिवाळ्यात हलक्या हिरव्या रंगाच्या आकाराने मोठ्या अशा भावनगरी मिरच्या बाजारात मिळतात. त्या तिखट नसतात. भरलेली मिरच्या वेगवेगळ्या प्रकारे मसाले वापरून केल्या जातात. मराठीत भरलेली मिरच्या तर गुजरातमध्ये भरेला मरचा असे म्हटले जाते. आज मी गुजराती स्टाईल ने भरलेल्या मिरच्या केल्या

रेसपी टैग

 • व्हेज
 • मध्यम
 • एव्हरी डे
 • महाराष्ट्र
 • सौटेइंग
 • साईड डिश
 • हेल्दी

साहित्य सर्विंग: 6

 1. 8/10 भावनगरी मिरच्या
 2. पाव वाटी भाजलेले शेंगदाणे
 3. पाव वाटी किसलेले सुके खोबरे
 4. 2 टेबलस्पून बेसन
 5. 1 टीस्पून लाल तिखट
 6. 1 टीस्पून धने पावडर
 7. 2 टेबलस्पून लिंबाचा रस
 8. चवीनुसार मीठ
 9. चिमूटभर साखर
 10. आवश्यकतेनुसार तेल
 11. हिंग व जिरे फोडणी साठी

सूचना

 1. मिरच्या स्वछ धूवून पुसून मध्ये चीर पाडून बिया काढून टाकाव्यात व आतून थोडे मीठ चोळून पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.
 2. शेंगदाणे व खोबरे वेगवेगळे भाजून घ्यावे . बेसन सुध्दा थोडे कोरडेच भाजावे
 3. भाजलेले शेंगदाणे व खोबरे मिक्सरमध्ये बारीक करून त्यात बेसन,लाल तिखट, धणे पावडर , साखर व मीठ घालून सर्व सारण एकत्र करावे.
 4. लिंबाचा रस घालून चांगले एकजीव करुन घ्यावे.महणजे सारणावा ओलसरपणा येतो.
 5. सर्व मिरच्यांमध्ये सारण भरून घेणे
 6. पॅन किंवा कढईत थोडे जास्तीचे तेल गरम करून त्यात जिरे व हिंग घालून फोडणी करावी व मिरच्या ठेवून पाच मिनिटांनी हलकेसे परतून झाकण ठेवून मंद आचेवर मिरच्या शिजवून घेणे. मध्ये मध्ये परतून घ्यावे. व मिरच्या पूर्ण शिजल्या कि गॅस बंद करावा.
 7. भरलेल्या मिरच्या वरण भात किंवा ताकाची कढी व भाताबरोबर अप्रतिम लागतात.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर