मुख्यपृष्ठ / पाककृती / मोड आलेल्या मुगाची भजी

Photo of Sprouted Moong Bhaji by Aarti Nijapkar at BetterButter
1821
2
0.0(0)
0

मोड आलेल्या मुगाची भजी

Dec-16-2018
Aarti Nijapkar
10 मिनिटे
तयारीची वेळ
20 मिनिटे
कूक वेळ
4 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

मोड आलेल्या मुगाची भजी कृती बद्दल

मूग हा आपल्या शरीरासाठी पौष्टिक घटक आहे सर्वानाच मूग हे आवडत नाही तर मोड आलेले मुगाची भजी केली की सर्वच खातील शिवाय कळणार ही नाही

रेसपी टैग

  • व्हेज
  • सोपी
  • एव्हरी डे
  • महाराष्ट्र
  • शॅलो  फ्रायिंग
  • स्नॅक्स
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 4

  1. मोड आलेले मूग १ वाटी
  2. कोथिंबीर १ मोठा चमचा
  3. कोथिंबीर १ मोठा चमचा
  4. हिरवी मिरची २ ते ३
  5. लसूण पाकळ्या ४ ते ५
  6. आलं  १/२ इंच
  7. जिरे  १ लहान चमचा
  8. बेसन पीठ १/२ वाटी किंवा आवश्यकतेनुसार
  9. मीठ चवीनुसार
  10. तेल भजी तळण्यासाठी

सूचना

  1. मोड आलेले मूग मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर भरड वाटून घ्या मग एका भांड्यात काढून घ्या
  2. आता त्याच मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर , जिरे ,हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या,आलं, हे सर्व साहित्य पाणी न घालता बारीक वाटून घ्या
  3. मुगाची भरड आणि वाटलेला मसाला , चवीनुसार मीठ ,आणि आवश्यकतेनुसार बेसन घालून मिश्रण एकजीव करून घ्या
  4. कढईत तेल तापवून घ्या तेल तापले की गॅस मध्यम आचेवर करून चमच्याच्या किंवा काट्याच्या साहाय्याने भज घालून घ्या दोन्ही बाजूने सोनेरी रंग होईपर्यंत तळून घ्या 
  5. गरमागरम मोड आलेल्या मुगाची भजी तयार चटणी किंवा केचप सोबत खाऊ शकता

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर