मुख्यपृष्ठ / पाककृती / दुध पुलि पिट्ठे

Photo of Dudh Puli Pitthe by Vaishali Joshi at BetterButter
860
3
0.0(0)
0

दुध पुलि पिट्ठे

Dec-16-2018
Vaishali Joshi
20 मिनिटे
तयारीची वेळ
40 मिनिटे
कूक वेळ
3 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

दुध पुलि पिट्ठे कृती बद्दल

ही एक बंगाली रेसिपी आहे ती मला माझ्या मैत्रीणीने शिकविली , ते लोक पुलि ही रेसिपी हिवाळ्य़ात करतात . मी करून बघितली , खुप टेस्टी आहे तुम्ही पण करून बघा .

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • फेस्टिव
  • वेस्ट  बंगाल
  • बॉइलिंग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 3

  1. तांदळाच पीठ ११/४ कप
  2. खवलेल खोबर १ कप
  3. गुळ १ कप
  4. वेलची पावडर १ चमचा
  5. मीठ१/४ छोटा चमचा
  6. तेल १ चमचा
  7. पाणी ११/२ कप
  8. दुध १/२ लिटर
  9. ड्राय फ्रूट्स

सूचना

  1. सर्वप्रथम कढईत खवलेल नारळ आणि १/२ कप गुळ एकत्र करून घट्ट शिजवून घ्या व त्यात वेलची पावडर व ड्राय फ्रूट्स घालून परतून घेउन सारण तयार करून बाजूला ठेवा
  2. गैस वर एक भांड्यात उकळत्या पाण्यात १/४ छोटा चमचा मीठ आणि १ चमचा तेल घालून ढवळून घेवुन त्यात तांदळाचे पीठ घाला , घोटून घ्या , थोडा वेळ झाकून ठेवा व उकड करून घ्या
  3. थंड झाल्यावर उकड खुप मळून घ्या , एकदम मऊ होईस्तोवर
  4. मध्यम आकाराचे गोळे तयार करून घ्या
  5. एकएक गोळा घेवुन हाताने त्याची पारी करून त्यात सारण भरुन त्याला करंजी सारखा आकार देऊन व्यवस्थित बंद करा , सर्व पुलि ( आपण करंजी म्हणुयात ) करून ठेवा आणि एक ओल्या कपड्यात झाकून ठेवा
  6. मग एक पैन मधे दूध उकळ्त ठेवा व त्यात १/४ चमचा तांदळा च पीठ( दुधात पेस्ट करून )घाला , दुधाला घट्ट पणा येण्या साठी
  7. त्यात १/२ कप गुळ घालून विरघळल्यावर त्यात एक एक करून तयार पुलि ( करंजी ) टाकुन ५-७ मिनिटे उकळू द्या . गैस बंद करा
  8. दुध पुलि पिट्ठे तयार आहे आवडीनुसार थंड किंवा गरम खावू शकता , डिश सर्व्ह करताना वरून ड्राय फ्रूट्स घालून सर्व्ह करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर