मुख्यपृष्ठ / पाककृती / ड्रायफ्रूट आणि डिंकाचे लाडू

Photo of Drayfruit aani dinkache ladu by pranali deshmukh at BetterButter
944
2
0.0(0)
0

ड्रायफ्रूट आणि डिंकाचे लाडू

Dec-16-2018
pranali deshmukh
60 मिनिटे
तयारीची वेळ
60 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

ड्रायफ्रूट आणि डिंकाचे लाडू कृती बद्दल

यामध्ये सर्वच सुकामेवा वापरला आहे शिवाय डिंकही घातला आहे .हिवाळ्यात अशाप्रकारे लाडू बनवले तर हि ऊर्जा आपल्याला वर्षभर पुरते .

रेसपी टैग

  • व्हेज
  • मध्यम
  • एव्हरी डे
  • इंडियन
  • ब्लेंडींग
  • डेजर्ट
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. खोबरा किस 250 ग्राम
  2. खारीक पावडर 250 ग्राम
  3. बदाम 125 ग्राम
  4. काजू 125 ग्राम
  5. अंजीर 125 ग्राम
  6. गोडंबी 100 ग्राम
  7. किसमिस 100 ग्राम
  8. डिंक 100 ग्राम
  9. पिस्ता 50 ग्राम
  10. अक्रोट 50 ग्राम
  11. वेलची 10 ग्राम
  12. जायफळ 1 नग
  13. तूप 2 वाट्या
  14. पिठीसाखर 2 वाटी
  15. चारोळी 10 ग्राम
  16. जायफळ 1 नग

सूचना

  1. खोबरे मंद आचेवर खरपूस भाजून घ्या.
  2. खारीक पावडर मिक्सरला परत फिरवून घ्या म्हणजे दातात अडकणार नाही
  3. बदाम काजू पिस्ता अक्रोड गोडंबी हे सर्व साहित्य वेगवेगळे मिक्सरला बारीक फिरवून घ्या
  4. खोबरा किस थंड करून मिक्सरला फिरवून घ्या .
  5. आता साजूक तुपात डिंक तळून घ्या तळताना डिंक थोडा थोडा टाका म्हणजे तो छान फुटेल .
  6. एका परातीत सर्व सुक्यामेव्याची पावडर एकत्र करा .
  7. त्यामध्ये पिठी साखर , डिंक , अंजिराचे तुकडे ,किसमिस , वेलची पूड , चारोळी , जायफळ पावडर हातानी छान मिक्स करून घ्या .
  8. आता ओलावा आणण्याकरिता पाहिजे तितके साजूक तूप घाला छान मिक्स करा .
  9. आणि लाडू वळून घ्या लाडू वळताना दाबून वळायचे आहे . पौष्टिक लाडू तयार .
  10. अंजिराचे बारीक तुकडे करा

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा
A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर