मुख्यपृष्ठ / पाककृती / पनीर टोमॅटो रसम

Photo of Paneer tomato rasam by seema Nadkarni at BetterButter
1401
2
0.0(0)
0

पनीर टोमॅटो रसम

Dec-16-2018
seema Nadkarni
30 मिनिटे
तयारीची वेळ
15 मिनिटे
कूक वेळ
5 लोक
सर्व्ह करावे
सूचना वाचा नंतरसाठी सेव करा

पनीर टोमॅटो रसम कृती बद्दल

हिवाळ्यात शरीरात गरमी यावी म्हणून वेगवेगळे पदार्थ खाल्ले जातात. टोमॅटो रसम गरम गरम प्यायला की आंगात गरमी येते.

रेसपी टैग

  • एग फ्री
  • मध्यम
  • इतर
  • साऊथ इंडियन
  • बॉइलिंग
  • सूप
  • हेल्दी

साहित्य सर्विंग: 5

  1. 3-4 मध्यम आकाराचे टोमॅटो
  2. 1 गाजर
  3. 2-3 चमचा चिंचेचा रस
  4. 2 चमचा रसम पावडर
  5. 50 ग्राम पनीर
  6. चवी पुरते मीठ
  7. 2 चमचा लसुण पेस्ट
  8. 1/2 चमचा जिरे
  9. फोडणी साठी तेल, कडीपत्ता,

सूचना

  1. टोमॅटो व गाजर ला स्वच्छ धुवून चिरून घ्यावे व पाणी घालून शिजवून घ्यावे.
  2. शिजलेले टोमॅटो व गाजर ला मिक्सर मधून प्युरी करून घ्यावे.
  3. प्युरी गाळून घ्यावे, म्हणजे साली व बीया निघून जातील.
  4. आता या मिश्रणात 1 1/2 कप पाणी घालून पातळ करावे. त्यात मीठ व रसम पावडर घालून एकत्र करावे.
  5. एका कढईत तेल तापवून त्यात जीरे ची फोडणी करून त्यात लसूण घालून थोडे लालसर होईपर्यंत परतावे. नंतर त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, कडीपत्ता घालून फोडणी करावी.
  6. या फोडणीत टोमॅटो - गाजर चे मिश्रण घालून एकरस करून घ्यावे.
  7. थोड्या वेळ उकळी आली की गॅस बंद करावा व त्यात चिंचेचा रस घालून एकत्र करावे.
  8. पनीर ला एकदम बारीक चिरून या रसम मध्ये घालून एकत्र करावे.

रिव्यूज (0)  

आपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल? कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.

रिव्यु सबमिट करा

तत्सम पाककृती

A password link has been sent to your mail. Please check your mail.
Close
शेर