शाही खीर | Shahi Khir Recipe in Marathi

प्रेषक Tejashree Ganesh  |  16th Dec 2018  |  
0 from 0 reviews Rate It!
 • Photo of Shahi Khir by Tejashree Ganesh at BetterButter
शाही खीरby Tejashree Ganesh
 • तयारी साठी वेळ

  10

  मि.
 • बनवण्यासाठी वेळ

  15

  मि.
 • किती जणांसाठी

  3

  माणसांसाठी

8

0

शाही खीर recipe

शाही खीर बनवण्यासाठी साहित्य ( Ingredients to make Shahi Khir Recipe in Marathi )

 • शेवया १ कप
 • तुप २ चमचे
 • लवंग ३
 • बदाम ५-६
 • काजू ५-६
 • अक्रोट ३-४
 • मनुके ७-८
 • पिस्ते ६-७
 • चारोळी १ चमचा
 • दुध २-३ कप.
 • खजूर ३-४ काप करून
 • साखर १/२ कप किंवा आवडी प्रमाणे
 • ईलायची पावडर
 • बडिशेप पावडर
 • जायफळ पावडर
 • गुलाब essence
 • गुलाब पाकळ्या सजावटी करिता

शाही खीर | How to make Shahi Khir Recipe in Marathi

 1. सर्व साहित्य एका प्लेट व वाटीमधे काढून घ्यावे,सुका मेवा क्रश करून घ्यावे.
 2. गॅसवर कढई किंवा फ्रयपॅन ठेवावा व त्यात तुप टाकावे.
 3. त्यानंतर लवंग व सर्व सुकामेवा टाकावा. (खजूर टाकू नये)
 4. सर्व साहित्य व्यवस्थित तळून घ्यावे.
 5. ह्यामधे शेवया टाकाव्यात.
 6. शेवया चांगल्या परतून घ्याव्यात. व त्यात दुध टाकावे.
 7. मिश्रण चांगले एकत्र करून घेऊन त्यात खजूर टाकावी.
 8. गुलाब पाकळ्या टाकाव्यात.
 9. थोडावेळ सर्व मिश्रण शिजू द्यावे. ( साधारण ३-४ मि. )
 10. नंतर ह्यात साखर व ईलायची पावडर, जायफळ पावडर, बडिशेप पावडर टाकावी. हे सर्व पावडर साधारण १/२ चमचा होतात.
 11. १ मि. सर्व मिश्रण ढवळून घ्यावे. ह्यामधे rose essence टाकावे. हे optional आहे.
 12. आपली शाही खीर तयार आहे. ही खीर एका bowl मधे काढून त्यावर rose petals आणि बदाम काप ने सजवावे.

My Tip:

ही खीर गरमही छान लागते व थंडही.. परंतू थंडीमधे गरम खाणे चांगले.

Reviews for Shahi Khir Recipe in Marathi (0)